पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इराणवरुन आले २७७ भारतीय; जोधपूरला विलगीकरण कक्षात ठेवले

इराणवरुन आलेले भारतीय

कोरोना विषाणूने जगभरात कहर केला असून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अशा परिस्थितीमध्ये परदेशात अडकलेल्या आपल्या नागरिकांना मायदेशी आणण्याचे प्रयत्न भारताकडून सुरु आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आज इराणवरुन २७७ भारतीयांना आणण्यात आले. प्राथमिक तपासणीनंतर त्यांना जोधपूर येथे विलनीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

घराबाहेर पडाल तर शत्रू आपल्या घरात प्रवेश करेल: मुख्यमंत्री

राजस्थान संरक्षण विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, इराणमध्ये २७७ भारतीय अडकले होते. त्यांना विशेष विमानाने आज भारतात आणण्यात आले. दिल्ली विमानतळावर आल्यानंतर त्यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना राजस्थानच्या जोधपूर विमानतळावर आणण्यात आले. त्याठिकाणावरुन त्यांना जोधपूरच्या मिलिटरी स्टेशनवर आणण्यात आले. याठिकाणी त्यांना विलनीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांनी सांगितली कोरोनाची पॉझिटिव्ह बाजू

दरम्यान, कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाला लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी २१ दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊन दरम्यान जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरु राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना घाबरण्याची गरज नसल्याचे सरकारने सांगितले.  आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशामध्ये आतापर्यंत ५६२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ११ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.