पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशातील २७४ जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव, २६७ रुग्ण झाले बरे

केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाचे सहसचिव लव आगरवाल (फोट - एएनआय)

कोरोना विषाणूचा देशातील २७४ जिल्ह्यांमध्ये शिरकाव झाला असून भारतात आतापर्यंत एकूण ३३७४ कोविड-१९ची प्रकरणे समोर आली आहेत. यात एकूण ४७२ नवीन प्रकरणे आहेत. ७९ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील ११ जणांचा शनिवारी मृत्यू झाला आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे २६७ रुग्ण बरे झाल्याचे त्यांनी ते म्हणाले. त्याचबरोबर कोरोना विषाणू हवेने पसरतो याचे प्रमाण आतापर्यंत मिळाले नसल्याचे भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषदेने (आयसीएमआर) स्पष्ट केले आहे. 

गृह मंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव म्हणाल्या की, राज्य सरकारांकडून लॉकडाऊनची प्रभावीरित्या अंमलबजावणी सुरु आहे. आवश्यक वस्तू आणि सेवांची स्थिती समाधानकारक आहे. विविध राज्यांमध्ये २७,६६१ मदत शिबीर आणि निवासस्थानाची सोय करण्यात आली आहेत. यातील २३९२४ सरकारांकडून आणि ३७३७ बिगर सरकारी संघटनाकडून स्थापन करण्यात आले आहेत. यामुळे १२.५ लाख लोकांना आश्रय मिळाला आहे. १९४६० खाद्य शिबिरे लावण्यात आली आहेत. 

तामिळनाडू, महाराष्ट्र आणि दिल्लीत एका दिवसांत कोरोना विषाणूचे अनुक्रमे ७४, ६७ आणि ५९ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. देशातील एकूण आकडा हा ३३७४ पर्यंत पोहोचला आहे.  

आरोग्य मंत्रालयाने रविवारी जारी केलेल्या अहवालानुसार, कोरोना विषाणूचा प्रकोप देशातील २९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पसरला आहे. आतापर्यंत ३३७४ प्रकरणांना पुष्टी मिळाली आहे. यामध्ये ६५ विदेशी नागरिकांचा समावेश आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे आतापर्यंत ७७ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर २६७ रुग्ण यातून पूर्णपणे बरे झाले आहेत.

देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात असून येथील आकडे ४९० आहे. महाराष्ट्रात २४ जणांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू असून तिथ ४८५ रुग्ण सापडले आहेत. तिथे तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर दिल्लीचा क्रमांक लागतो. तिथेही ४४५ रुग्ण आढळले आहेत. दिल्लीत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये ३०६ संक्रमित आहेत. तिथेही दोघांचा मृत्यू झाला आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:274 districts across the country have been affected due to Coronavirus till date ICMR said No evidence of COVID19 being airborne yet