पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बालाकोटमध्ये पुन्हा दहशतवादी प्रशिक्षण अड्डे कार्यरत, २७ जणांना प्रशिक्षण

बालाकोटमध्ये पुन्हा दहशतवादी प्रशिक्षण अड्डे कार्यरत

पाकिस्तानातील बालाकोटमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांना भारताविरोधात हल्ला करण्यासाठी प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. बालाकोटमधील जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमध्ये सध्या २७ जणांना हल्ल्यासाठीचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली. गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये बालाकोटमध्ये भारताने हवाई हल्ले करीत तेथील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. 

कोरोनावरील लस, ऑस्ट्रेलियातील भारतीय शास्त्रज्ञाचे कौतुकास्पद काम

जैशच्या दहशतवाद्यांना गेल्यावर्षी पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यानंतर भारताकडून फेब्रुवारीमध्ये बालाकोटमध्ये रात्रीच्या वेळी मिराज विमानांच्या साह्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये बालाकोटमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले होते. पण त्याच ठिकाणी पुन्हा एकदा अड्डे सुरू झाले आहेत. जैशचा म्होरक्या मौलाना मसूद अजहर याचा नातेवाईक युसूफ अजहर याच्याकडेच या ठिकाणी दहशतावाद्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

कोरोनासंदर्भात सर्वात आधी धोक्याचा इशारा देणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, एकूण २७ दहशतवाद्यांना या ठिकाणी प्रशिक्षण दिले जात आहे. भारतात हल्ला करण्यासाठीच या दहशतवाद्यांना तयार करण्यात येत आहे. एकूण २७ जणांपैकी ८ जण हे पाकव्याप्त काश्मीरमधून आहेत. त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पाकिस्तानातील पंजाब प्रांतातून दोघांना आणि अफगाणिस्तानातून तिघांना बालाकोटमध्ये आणण्यात आले आहे. या आठवड्यातच या सर्व दहशतवाद्यांचे प्रशिक्षण पूर्ण होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांना भारतात घुसखोरी करण्यासाठी पाठविले जाईल. भारताने गेल्यावर्षी ज्यावेळी या ठिकाणी हवाई हल्ले केले होते. त्यावेळी तिथे ३०० जणांना दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जात होते.