पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लग्नाला नकार दिला म्हणून त्याने तिचा खून केला आणि नंतर...

चिमुकलीचा मृत्यू

केवळ लग्नाच्या प्रस्तावाला नकार दिला म्हणून एका २६ वर्षांच्या युवकाने १७ वर्षांच्या तरुणीचा खून केला आणि नंतर तिचा मृतदेह चहाच्या मळ्यामध्ये फेकून दिल्याची घटना केरळमध्ये घडली. जफर शहा असे आरोपीचे नाव आहे. त्याने तरुणीचा मृतदेह तामिळनाडूमध्ये फेकून दिला. जफर शहा मॅकेनिक म्हणून गाड्या दुरुस्तीचे काम करतो.

दीपिकाच्या छपाक सिनेमाची तिकीटे रद्द केल्याचे ते स्क्रिनशॉट किती खरे?

आपली मुलगी घरी आली नसल्याचे कळल्यावर तिच्या वडिलांनी मंगळवारी पोलिसांकडे याबद्दल तक्रार केली. महाविद्यालयातून ती घरी आली नसल्याचे वडिलांनी पोलिसांना सांगितले. त्यावेळी वडिलांनी पोलिसांना जफर शहाबद्दल माहिती दिली. त्याने याआधी आपल्या मुलीशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, असे तिच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी लगेचच जफर शहाच्या मोबाईलचे लोकेशन बघितले. मोबाईल तामिळनाडूत वलपराईमध्ये असल्याचे त्यांच्या लक्षात आले. लगेचच पोलिसांनी तामिळनाडू पोलिसांना याबद्दल माहिती दिली. पोलिसांनी केलेल्या तपासणीत त्यांना जफर शहाची गाडी दिसली. पण या गाडीमध्ये तरुणी नव्हती. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने तिची हत्या करून मृतदेह चहाच्या मळ्यात फेकून दिल्याचे सांगितले. 

बगदादमधील ग्रीन झोनमध्ये अमेरिकेच्या दूतावासाजवळ क्षेपणास्त्र हल्ला

तामिळनाडू पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. तरुणीच्या अंगावर अनेक जखमा असून, तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. आरोपी आणि तरुणीचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी केरळ पोलिसांचे एक पथक तामिळनाडूला रवाना झाले आहे.