पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इराणला गेलेल्या २५४ भारतीयांना कोरोनाची लागण

इराणमध्ये कोरोनाचा कहर

इराणमध्ये गेलेल्या २५४ भारतीयांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. एका अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली. यामधील बहुतेक भारतीय केंद्रशासित प्रदेश लदाखच्या लेह आणि कारगिल जिल्ह्यातील आहेत. यापूर्वी, आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इराणमध्ये एकूण १६ हजार १६९ नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर इराणमध्ये कोरोनामुळे ९८८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

सरकारी कर्मचारी ऑन ड्युटी अन् लोकलही ऑन टाइम, पण...

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी इराणने सोमवारी देशातील चार महत्त्वाचे शिया धार्मिक स्थळं बंद करण्याचा निर्णय घेतला. पुढील आदेश मिळेपर्यंत मशहद येथील इमाम रझा, कौम येथील फातिमा मासुमा आणि तेहरान येथील शाह अब्दुल-अझिम बंद ठेवण्याचा निर्णय आरोग्यमंत्र्यांनी घेतला आहे. २५ मार्चपर्यंत ही धार्मिक स्थळं बंद राहणार आहेत. त्याचसोबत कौम येथील जमकरान मशीद देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी नाही : उद्धव ठाकरे

दरम्यान, भारतात देखील कोरोना विषाणूने कहर केला आहे. आतापर्यंत १३७ नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. मुंबईमध्ये मंगळवारी एका ६३ वर्षांच्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे भारतात कोरोनामुळे मृतांचा आकडा तीनवर पोहचला आहे. आरोग्य मंत्र्यालयाने मंगळवारी याबाबतची माहिती दिली. तर महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा ४१ वर पोहचला आहे. 

कोरोनामुळे मध्य रेल्वेने २३ लांबपल्ल्यांच्या गाड्या केल्या रद्द