पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

२४ वर्षांच्या तरुणीवर चुलत भावाकडूनच हॉटेलात लैंगिक अत्याचार

प्रातिनिधिक छायाचित्र

महेंद्रगढहून परीक्षा देण्यासाठी गुरुग्रामला आलेल्या एका २४ वर्षीय तरुणीने तिच्यावर चुलत भावाने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार केली आहे. दोन महिन्यांपूर्वी ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

अशा वातावरणात दिल्लीत राहू शकत नाहीः अरविंद सावंत

परीक्षा देण्यासाठी संबंधित तरुणी गुरुग्रामला आली होती. त्यावेळी परीक्षा केंद्रावरून आरोपी चुलत भावाने तिला आपल्यासोबत एका हॉटेलवर नेले. आपल्यासोबत आज हॉटेलवरच राहा, असे या तरुणाने तिला सांगितले. त्यानंतर हॉटेलमध्ये रात्रीच्या वेळी झोपेत असताना आरोपी तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. 

शेतकऱ्यांच्या अजेंड्यावर शिवसेना- राष्ट्रवादी एकत्र काम करणार

२२ सप्टेंबर रोजी ही घटना घडली. पण या प्रकरणी रविवारी गुरुग्राम पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी पीडित तरुणीचा जबाब नोंदवून घेतला आहे. पीडित तरुणीने परीक्षा असल्यामुळे लगेचच या प्रकरणी तक्रार दाखल केली नव्हती. पण गेल्या काही दिवसांपासून या घटनेचा त्रास होत असल्यामुळे तिने अखेर कुटुंबियांना याबद्दल माहिती दिली. त्यानंतर पोलिसांकडे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुग्राम पोलिस अधिक तपास करीत आहेत.