पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टाइमपाससाठी मित्रांबरोबर पत्ते खेळायला गेला ट्रक ड्रायव्हर, २४ जण पॉझिटिव्ह

टाइमपाससाठी मित्रांबरोबर पत्ते खेळायला गेला ट्रक ड्रायव्हर, २४ जण पॉझिटिव्ह

आंध्र प्रदेशमधील विजयवाडा शहरात लॉकडाऊनमुळे टाइमपास करण्यासाठी मित्र आणि शेजाऱ्यांच्याबरोबर पत्ते खेळण्याच्या नादात २४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कृष्णा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ए मोहम्मद इम्तियाज यांनी ही माहिती दिली. 

देशात कोरोनाविरोधातील लढाईचे नेतृत्व जनता करतेय: पंतप्रधान

ते म्हणाले की, विजयवाडाच्याच एका दुसऱ्या भागात आणखी एका ट्रक चालकाबरोबर टाइमपास केलेल्या आणखी १५ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. या दोन घटनांमुळे सुमारे ५० जण कोरोना विषाणू बाधित झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 

ट्रम्प पत्रकारांच्या प्रश्नांना घाबरले? आता नियमित पत्रकार परिषद बंद

शहरातील कृष्ण लंका परिसरात वेळ व्यतीत करण्यासाठी ट्रक चाल मित्र आणि शेजाऱ्यांच्याबरोर पत्ते खेळत होता. तर त्यांच्यातील महिला गटागटाने तंबोला खेळत होत्या. यादरम्यान सोशल डिस्टन्सिंग न पाळल्यामुळे २४ जण कोरोनाबाधित झाले. 

अशाच प्रकारची घटना कर्मिका नगरमध्ये घडली. तेथेही ट्रक चालकाने सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्यामुळे १५ जण कोरोना विषाणू बाधित ठरले. सामाजिक अंतर पाळण्याचे अनुपालन न केल्यामुळे संक्रमण वाढल्याचे आपल्या व्हिडिओ संदेशात जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले. विजयवाडामध्ये कोरोनाचे आतापर्यंत सुमारे १०० प्रकरणे समोर आली आहेत.

कितीही डोके फोडले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहणार: संजय राऊत

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:24 people have coronavirus positive in andhra pradesh after truck driver played taash or cards with his friends