पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वऱ्हाड्यांना घेऊन निघालेली बस नदीत कोसळून २४ ठार

बस नदीत कोसळून २४ ठार

वऱ्हाडी मंडळींना घेऊन निघालेली मिनी बस नदीत कोसळून राजस्थानमधील  लखेरी भागात २४ जण ठार झाले आहेत.  बुंदी जिल्ह्यातील मेज नदीजवळ बुधवारी सकाळी हा अपघात झाला आहे. 

केजरीवालांच्या निवासस्थानाला घेराव, विद्यार्थ्यांवर पाण्याचा मारा

या परिसरात स्थानिकांच्या मदतीनं शोध मोहीम सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार बस मर्यादेपेक्षा अधिक वेगानं धावत होती चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानं ती पुलावरून खाली नदीत कोसळली.  पुलाला कठडा नव्हता अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.  

दिल्लीतील स्थितीवरून काँग्रेसचा अमित शहांवर निशाणा, राजीनाम्याची मागणी

या मिनी बसमध्ये अपघातावेळी २९ वऱ्हाडी मंडळी होते. त्यातल्या २४ जणांचा मृत्यू झाला आहे तर ५ जण अत्यंत गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना दोन वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.