पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्लीत एअर हॉस्टेसची आत्महत्या, घरमालकाच्या जाचाला कंटाळून संपवले आयुष्य

आत्महत्या (प्रतिकात्मक छायाचित्र)

दिल्लीत २३ वर्षांच्या एअर हॉस्टेसने मंगळवारी पहाटे गळफास लावून आत्महत्या केली मंगळवारी सकाळी तिचा मृतदेह तिच्या खोलीतील फॅनला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. ही एअर हॉस्टेस ज्या ठिकाणी राहात होती. तेथील घरमालक तिला खूप त्रास देत होता. मुलीने माझ्याकडे त्याची तक्रार केली होती, असा आरोप या एअर हॉस्टेसच्या वडिलांनी केला. 

NDA तून बाहेर पडलो असलो, तरी आम्ही UPA सोबत नाही - संजय राऊत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी मूळची पश्चिम बंगालची राहणारी आहे. गेल्या वर्षभरापासून ती गुरुग्राममध्ये राहायला आली होती. एका खासगी विमान कंपनीमध्ये ती एअर हॉस्टेस म्हणून कार्यरत होती. मंगळवारी पहाटे अडीच वाजता ही घटना घडली. त्याच दिवशी सकाळी साडेआठ वाजता गेस्ट हाऊसच्या व्यवस्थापकाने तिच्या खोलीत तिचा मृतदेह बघितला आणि पोलिसांना त्याची माहिती दिली. 

पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत संबंधित तरुणीच्या वडिलांनी सांगितले की, मंगळवारी पहाटे दोन वाजता तिचा मला फोन आला होता. त्यावेळी तिने घरमालक आपल्याला खूप मानसिक त्रास देत असल्याचे सांगितले. तिचा मोबाईलही त्याने हॅक केल्याची माहिती तिने मला दिली. मी तिला लगेचच आपल्या गावी परतण्यास सांगितले. त्यानंतर थोड्या वेळाने घरमालकाचा मला फोन आला. त्याने सांगितले की, बहुतेक तुमच्या मुलीने स्वतःचे आयुष्य संपवले आहे.

ट्रम्पविरोधात कनिष्ठ सभागृहात महाभियोग मंजूर, आता पुढे काय?

मंगळवारी सकाळी मला पुन्हा फोन आला. त्यावेळी माझ्या मुलीने आत्महत्या केल्याचे मला सांगण्यात आले, असे तिच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले. 

आम्ही या प्रकरणाचा तपास करीत असून, अद्याप घरमालकाला अटक केलेली नाही, असे डीएलएफ फेज-३चे पोलिस उप-निरीक्षक राम निवास यांनी सांगितले.