पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाशी लढाई: २.२ अब्ज लोकांकडे सतत हात धुवायला पाणीच नाही

कोरोनाशी लढण्यासाठी साबणाने हात धुणे गरजेचे

संपूर्ण जग जीवघेण्या कोरोना विषाणूची लढाई जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि अर्धा-एक तासाने २० सेकंद साबणाने हात धुणे गरजेचे आहे. मात्र संयुक्त राष्ट्र संघाच्या एका अहवालातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जगातील तब्बल २.२ अब्ज लोकांकडे पाण्याची सोय नाही. त्यामुळे कोरोनापासून वाचण्यासाठी त्यांना सतत हात धुण्यासाठीच पाणी नाही. तर दुसरीकडे जगातील जवळपास ५० टक्के ग्रामीण लोखसंख्या आणि २० टक्के शहरी लोकसंख्या चांगल्या आरोग्य सुविधांपासून दूर आहे, असे या अहवालात म्हटले आहे. यामुळे जगभरात सध्या किती भयावह परिस्थिती आहे याचा अंदाज लावला जाऊ शकतो.

... आणि कोरोना प्रतिबंधक प्रोटेक्टिव्ह सूट्सचे उत्पादन देशात झाले सुरू

कोरोनाविरोधातील लढाई जगासाठी खूप महागडी ठरणार आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालामध्ये असे म्हटले आहे की, सद्य परिस्थिती पाहता जगातील १० टक्के जीडीपी एवढी रक्कम कोरोनाच्या लढाईसाठी खर्च होण्याची शक्यता आहे. या अहवालात पुढे असे देखील सांगितले आहे की, सद्यस्थितीत जगातील देशांना उत्पादनांवरील प्रतिबंध विसरुन एकत्र आले पाहिजे आणि कोणतेही कठोर नियम न ठेवता आयात-निर्यात चालू ठेवण्यास परवानगी द्यावी लागेल. तसंच, त्यांना कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या उत्पादनांवरील कर देखील रद्द करावा लागेल.

कोरोना विषाणू ट्रॅकर अ‍ॅप 'आरोग्य सेतू' डाऊनलोड करा आणि सुरक्षित राहा

कोरोनामुळे परदेशात काम करणारे कामगार सर्वात जास्त प्रभावित झाले असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालात म्हटले आहे. जगातील अनेक देशांची अर्थव्यवस्था या कामगारांच्या कमाईवर अवलंबून असते. अशामध्ये, परदेशात काम करणारे कामगार भारतासारख्या विकसनशील देशांच्या परकीय चलन उत्पन्नात हातभार लावतात. या अहवालानुसार जगातील बर्‍याच देशांनी आपल्या सीमा बंद केल्या आहेत. यामुळे प्रवासी कामगारांच्या अडचणी सुद्धा वाढल्या आहेत.

देशातील १५६ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे