पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना : ... तर इंग्लंडमध्ये पाच लाख आणि अमेरिकेत २२ लाख मृत्युमुखी - संशोधन

कोरोना विषाणू

कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे युरोपमधील देशांमध्ये आणि अमेरिकेमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. त्यातच एका संशोधनातील निष्कर्षांवरून इंग्लंड आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे या दोन्ही देशाचे सर्वाधिक किती नुकसान होऊ शकते, याचा एक अंदाज या संशोधनात वर्तविण्यात आला आहे. या संशोधनानुसार, जर कोरोना विषाणूचे मोठ्या प्रमाणात संक्रमण अमेरिकेत झाले तर तिथे २२ लाख लोक मृत्युमुखी पडतील. तेच जर इंग्लंडमध्ये झाले तर तिथे पाच लाख लोकांचा यामुळे बळी जाईल. 

कोरोना विषाणू प्लॅस्टिक, स्टीलवर २ ते ३ दिवस सक्रिय राहतात, नवे संशोधन

इम्पेरियल कॉलेज लंडन येथील मॅथेमॅटिकल बायोलॉजी विभागातील प्राध्यापक नील फर्गसन यांच्या नेतृत्त्वाखाली गटाने हे संशोधन केले. गेल्या काही दिवसांत इटलीमध्ये या विषाणूच्या संक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना आपले प्राण गमवावे लागले. तेथील डेटाचा अभ्यास करून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

या निष्कर्षांनंतर इंग्लंडमधील सरकारने कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी कडक निर्बंध लादले आहेत. इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्वतःचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम तातडीने रद्द केले. आपल्या देशामध्ये जे ७० पेक्षा जास्त वय असलेले नागरिक आहेत. त्यांनी कोणत्याही स्थितीत सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये. आपल्या घरातच विलगीकरण पद्धतीने राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

कर्नाटकात आमदारांना भेटायला गेलेले दिग्विजय सिंह ताब्यात

सार्वजनिक ठिकाणी वापरताना एकमेकांपासून आवश्यक अंतर राखणे, क्लब, पबमध्ये जाणे कटाक्षाने टाळणे, अशा सूचना या संशोधनात देण्यात आल्या आहेत. समाजावर आणि अर्थव्यवस्थेवर कोरोना विषाणूचा गंभीर परिणाम होईल, असेही संशोधनकर्त्यांपैकी एकाने म्हटले आहे.