पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोबाईल चोरट्याला मिळाली मोठी शिक्षा, बोटाचे करावे लागले ऑपरेशन!

चोरट्याच्या बोटावर शस्त्रक्रिया करावी लागली. (संग्रहित फोटो)

दिल्लीमध्ये बागेत मोबाईल चोरीसाठी आलेल्या एका चोरट्याला मोठी शिक्षा मिळाली. ज्याच्या हातातून त्याने मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला, त्याने आपल्या दातांनी चोरट्याच्या बोटाचा पूर्ण ताकदीने चावा घेतला. त्यामुळे या चोरट्याच्या अंगठ्या शेजारील बोटावर शस्त्रक्रिया करावी लागली. पूर्व दिल्लीतील ज्योती नगर भागात मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली.

निर्भया प्रकरणातील चारही दोषींवर सतत लक्ष ठेवलं जातंय, का माहितीये?

ज्याने चोरट्याच्या बोटाचा चावा घेतला त्या तक्रारदार व्यक्तीचे नाव देव राज असे आहे. ते मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घराजवळील बागेत बसले होते. त्यावेळी दोघे जण त्यांच्याजवळ आले. त्यांच्यापैकी एकाने देव राज यांचा गळा दाबला. त्यांनी आरडाओरडा सुरू केल्यावर दुसऱ्याने त्यांचे तोंड बंद कऱण्यास सुरुवात केली. त्याचवेळी त्याचे बोट देव राज यांच्या तोंडात गेले. त्यांनी पूर्ण ताकदीने चोरट्याच्या बोटाचा चावा घेतला. या चाव्यामुळे त्याने तोंडावरचा हात काढून घेतला. त्यामुळे त्यांना पुन्हा ओरडण्यास संधी मिळाली. त्यांनी आरडाओरडा सुरू केल्यावर बागेतील आजूबाजूचे लोक तिथे आले. त्यांनी दोन्ही चोरट्यांना पकडले.

ज्याच्या बोटाला गंभीर दुखापत झाली आहे त्या चोरट्याचे नाव रोहित असे आहे. बागेतील नागरिकांनी दोन्ही चोरट्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी रोहितला जीटीबी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केल्यावर त्याच्या बोटावर शस्त्रक्रिया करावी लागली. दुसरा चोरटा राजलाही दुखापत झाली आहे. पण त्याला उपचारांनंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

भीमा-कारेगाव तपास NIAकडे : फडणवीसांकडून स्वागत, थोरातांची टीका

दिल्लीचे पोलिस सहआयुक्त आलोक कुमार यांनी या दोन्ही चोरट्यांविरुद्ध याआधी कोणतेही गुन्हे दाखल नसल्याचे सांगितले. त्याचबरोबर त्यांनी आणखी काही मोबाईल चोरले आहेत का, याचाही तपास करण्यात येत असल्याचे सांगितले.