पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गुजरातमध्ये भाविकांची बस दरीत कोसळली; २१ जणांचा मृत्यू

गुजरातमध्ये बसला अपघात

गुजरातमध्ये भाविकांच्या बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये २१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गुजरातच्या अंबाजीजवळ ही घटना घडली आहे. अंबाजी मंदिरातून दर्शन घेऊन परत येत असताना त्रिशूलिया घाटामध्ये भाविकांची बस दरीमध्ये कोसळली. या अपघातात २१ जणांचा मृत्यू तर १० जण गंभीर जखमी झाले आहेत.

 

शिवस्मारक प्रकल्पात कोट्यवधीचा घोटाळा : काँग्रेस

मिळालेल्या माहितीनुसार, अंबाजी मंदिरामध्ये दर्शनासाठी काही भाविक खासगी बस करुन आले होते. देवदर्शन आटोपल्यानंतर ते परत जात असताना अपघात झाला. अंबाजीच्या त्रिशूलिया घाटामध्ये बस अचानक दरीमध्ये कोसळली. या अपघातामध्ये २१ जणांचा मृत्यू झाला तर १० जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बसमधून बाहेर काढून नजीकच्या रुग्णालयात दाखल केले.

अजितदादांविरोधात मुख्यमंत्री ढाण्या वाघाला मैदानात उतरवणार

या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केले. त्यांनी ट्विट करत असे म्हटले आहे की, 'बनासकंठा येथे अतिशय दु:खद बातमी आली. अपघातामध्ये मृत्यू झाल्याचे ऐकून खूप दु:ख झाले. मृतांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. स्थानिक प्रशासन जखमींना सर्वतोपरी मदत करत आहे. ते लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो.' 

सुरुवात त्यांनी केली, शेवट आम्ही करु: अजित पवार

अपघातामधील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामधील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी फोनवर बोलून जखमींना ताबडतोब मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. 

होय, मी निवडणूक लढवतोय - आदित्य ठाकरे