पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Vijay Diwas : कारगिल विजय दिवसानिमित्त देशभरात कार्यक्रम

कारगिल विजय दिवसानिमित्त द्रासमध्ये सलामी देताना जवान (फोटो एएनआय)

कारगिल विजय दिवस शुक्रवारी संपूर्ण देशात उत्साहात साजरा केला जातो आहे. या दिनानिमित्त काश्मीरमधील द्रास येथील कारगिल युद्ध स्मारक फुलांनी सजविण्यात आले आहे. देशाच्या शूर जवानांच्या विजयाची यशोगाथा ठरलेला कारगिल विजय दिवस दरवर्षी साजरा केला जातो. यंदाचे हे २० वे वर्ष आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शुक्रवारी सकाळी ट्विट करून कारगिल युद्धाच्या त्यांच्या आठवणी आणि फोटो शेअर केले आहेत. कारगिल युद्धाच्या वेळी त्यांना घटनास्थळी जाण्याची संधी मिळाली होती. युद्धात सहभागी असलेल्या जवानांसोबत काही वेळ व्यतित करण्याची संधीही मिळाल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यावेळी ते जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात भाजपसाठी काम करीत होते. या सर्व आठवणींना त्यांनी फोटोंच्या माध्यमातून ट्विटरवर उजाळा दिला आहे.

राजधानी नवी दिल्लीमध्येही कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधत शहीद जवानांना नमन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये होणाऱ्या कार्यक्रमात नरेंद्र मोदी स्वतः सहभागी होणार आहेत. या दिवसानिमित्त त्यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

कर्नाटकमध्ये शिवमोंगा येथे कारगिल विजयाच्या निमित्त भारतीय जवानांना समर्पित एका बागेची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचेही उदघाटन शुक्रवारी करण्यात येणार आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:20th kargil vijay divas being celebrate across the country including kargil war memorial in dras