पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

२०२२ मधील प्रजासत्ताक दिनाचे संचलन नव्या राजपथावर

प्रजासत्ताक दिनाचे राजपथावरील संचलन

प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत राजपथावर होणारे संचलन हा सर्वच भारतीयांसाठी औत्सुक्याचा विषय असतो. पण लवकरच राजपथाच्या कायापालटाचे आणि सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे २०२२ मध्ये होणारे संचलन नव्या राजपथावर होणार आहे. राजपथावरील सुधारणांचे आणि सुशोभीकरणाचे काम नोव्हेंबर २०२१ पर्यंत संपविण्याचे केंद्र सरकारने निश्चित केले आहे.

नवी दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवन ते विजय चौक हा मार्ग राजपथ म्हणून ओळखला जातो. दरवर्षी २६ जानेवारीला या ठिकाणी संचलन होत असते. संचलनाची सुरुवात रायसीना हिल येथून होते आणि त्याचा शेवट इंडिया गेटजवळ होतो. 

विक्रम लँडरशी संपर्क प्रस्थापित होण्याची शक्यता संपुष्टात - तज्ज्ञ

ल्युटन्स दिल्ली म्हणूनही ओळखला जाणाऱ्या या भागाचा कायापालट करण्याचे केंद्र सरकारने निश्चित केले आहे. यामध्ये २०२२ पर्यंत संसद भवनाचा कायापालट केला जाईल. त्याचबरोबर सर्व सरकारी कार्यालयांसाठी एकात्मिक कॉम्प्लेक्स २०२४ पर्यंत उभारण्याचे सरकारने निश्चित केले आहे. त्यामध्ये राजपथाचाही कायापालट करण्यात येणार आहे. 

केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, राजपथाच्या कायापालटाचे आणि सुशोभीकरणाचे काम फेब्रुवारी २०२१ पासून सुरू करण्यात येईल. सध्याच्या स्थितीवरून या संपूर्ण परिसराचा कायापालट करण्याची गरज असल्याचे दिसून येते आहे. सध्या या ठिकाणी विद्युत खांब आहेत, अनेक विक्रेते फिरत असतात, वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळते. पण आता हा परिसर इतर देशातील अतिमहत्त्वाच्या भागासारखा विकसित केला जाईल. वॉशिंग्टन डीसी किंवा पॅरिसचे उदाहरण आपण बघू शकतो. आमच्याकडे जागा उपलब्ध आहे. फक्त आता कायापालट करण्याची गरज आहे.

कायापालट करताना ल्युटन्स दिल्लीतील मूलभूत ढाच्याला धक्का लावला जाणार नाही. पण ही जागा अधिक सुशोभित आणि मॉडर्न केली जाणार हे नक्की आहे. सध्या आम्ही ल्युटन्स दिल्लीतील बांधकामे, त्यांची रचना याचा सखोल अभ्यास करीत आहोत, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्री हरदीप पुरी यांनी हिंदुस्थान टाइम्सला सांगितले की, नॉर्थ ब्लॉक किंवा साऊथ ब्लॉकच्या बाहेरच्या बाजूला कोणतेही बदल केले जाणार नाहीत. पण ही जागा आता अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे अद्ययावत रचनेची गरज निर्माण झाली आहे.

नरेंद्र मोदी अमेरिकेला रवाना, जागतिक नेतृत्त्वासाठी उपयुक्त दौरा

अधिकारी म्हणाले की, राष्ट्रपती भवन, साऊथ ब्लॉक आणि नॉर्थ ब्लॉक या इमारती भूकंपाचे धक्के सहन करण्यासाठी पूरक नाहीत. त्यामुळे त्यामध्ये बदल करणे आवश्यक आहेत. पण या इमारतींच्या बाह्य बाजूला हातही लावला जाणार नाही. क्वालालंपूर आणि ब्राझील येथे नव्या संसद भवनाची उभारणी करण्यात आली आहे. तेथील तज्ज्ञांचा सल्लाही आम्ही घेणार आहोत.