भारताच्या तिसऱ्या चांद्रमोहिमेला अर्थात चांद्रयान-३ ला केंद्र सरकारने मंजुरी दिली असल्याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख के सिवन यांनी बुधवारी दिली. चांद्रयान-३ च्या पूर्वतयारीचे काम सध्या व्यवस्थितपणे सुरू असल्याचे सिवन यांनी स्पष्ट केले. २०२० मध्येच ही चांद्रमोहिम आखण्यात येणार असल्याचे मंगळवारी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले होते.
कर्ज वसुलीसाठी विजय मल्ल्याची संपती विकणार; पीएमएलए कोर्टाची परवानगी
के. सिवन म्हणाले, चांद्रयान-२ प्रमाणेच चांद्रयान-३ मोहिम असेल. दोन्हींमध्ये फार मोठा फरक असणार नाही. चांद्रयान-२ मध्ये ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर होते. चांद्रयान-३ मध्ये प्रॉप्लशन मोड्यूलच्या साह्याने लँडिंगच आणि रोव्हरचे काम चालेल, असे त्यांनी सांगितले. इस्रोसाठी हे संपूर्ण वर्ष भरगच्च कार्यक्रमांचे असेल, असेही त्यांनी सांगितले.
२०२० वर्ष इस्रोसाठी चांद्रयान-३ आणि गगनयान या दोन महत्त्वपूर्ण मोहिमांचे असेल. २०१९ मध्ये आम्ही गगनयान मोहिमेसंदर्भात चांगली प्रगती केली आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून या मोहिमेतील अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात होईल. इस्रोकडून अंतराळात मनुष्य पाठविण्याची गगनयान ही पहिलीच मोहिम असेल. २०२२ मध्ये गगनयानचे प्रक्षेपण होणे अपेक्षित आहे. एकूण तीन अंतराळवीरांना या मोहिमेतून अंतराळात पाठवून त्यांना सुरक्षितपणे परत आणण्यात येणार आहे, असे के. सिवन यांनी सांगितले.
पदभार स्वीकारताच रावत म्हणाले, आम्ही राजकारणापासून दूरच
अंतराळात उपग्रह पाठविण्यासाठी प्रक्षेपक तळ वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या दृष्टीने २०१९ मध्ये तामिळनाडूतील थूथुकुडी येथे इस्रोने जागा ताब्यात घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.