पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राहुल गांधी अन् प्रियांका गांधी यांना अमित शहांनी दिले चॅलेंज

सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन अमित शहांनी दिले चॅलेंज

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी यांना आव्हान दिले आहे. नागरिकत्व कायद्यामुळे नागरिकत्व कसे जाईल, हे त्यांनी सिद्ध करावे, असे शहा यांनी म्हटले आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच अमित शहा यांनी एबीपी न्यूज या वृतवाहिनीला मुलाखत दिली आहे. यात त्यांनी सुधारित नागरिकत्व कायदा, झारखंड विधानसभा निवडणूक आणि जम्मू काश्मीरमधील कलम ३७० यासारख्या विषयावर भाष्य केले.    

 

पाकविरुद्धच्या युद्धांचे दाखले देत काँग्रेसने साधला PM मोदींवर निशाणा

२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा दाखला देत अमित शहा यांनी मागील वर्ष भाजपसाठी खूपच चांगले असल्याचे सांगितले. वर्षाच्या अखेरीस भाजपला झारखंड विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता. यावर ते म्हणाले की, झारखंडमध्ये जनतेने दिलेल्या कौल हा आत्मचिंतन करायला लावणारा आहे.    

महाआघाडी सरकारच्या खातेवाटपासंदर्भात पवार म्हणाले की, ...

सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व हे मुद्दे एकत्रित करुन जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यात येत आहे, असा आरोप शहांनी काँग्रेसवर केला. एवढेच नाही तर सुधारित नागरिकत्व कायद्यातील कोणत्या तरतूदीमुळे नागरिकत्व जाईल, हे सिद्ध करुन दाखवा, असे आव्हानच त्यांनी प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांना दिले आहे. सुधारित कायद्याच्या विरोधात देशभरात ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनाविषयी बोलताना अमित शहा यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केलाय. ज्या ठिकाणी काँग्रेसची सत्ता आहे त्याठिकाणी हिंसक आंदोलन का झाले नाही? यावरुन आंदोलनाला हिंसक वळण कोण देत आहे, हे जनतेच्या लक्षात आल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसवर टीका केली.