या वर्षातील अखेरचे सूर्यग्रहण आज होणार आहे. २६ डिसेंबर म्हणजेच आज होणारे ग्रहण हे ५८ वर्षांतील सर्वांत मोठे सूर्यग्रहण असल्याचे सांगण्यात येत आहे. केरळ, कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. कोईमतूर, तिरूचिरापल्ली, मंगळुरूमध्ये सौरकंकण दिसेल. भारताच्या अन्य भागांत ते खंडग्रास दिसेल. सूर्यग्रहण सर्वप्रथम गुजरातमधील द्वारका येथे दिसणार आहे.
अटलजींच्या २५ फूट उंच अन् ५ टन वजनी पुतळ्याचे PM मोदींकडून अनावरण
सूर्यग्रहणाची वेळ
गुरुवारी सकाळी ८ वाजून ४ मिनिटांनी ग्रहणास प्रारंभ होणार आहे. तर सकाळी ९ वाजून २२ मिनिटांनी ग्रहणमध्य होईल. त्यावेळी जास्तीत जास्त सूर्य चंद्रामुळे झाकोळलेला दिसेल. १०.४८ वाजता ग्रहणाचा मध्य असेल. दुपारी १.३६ वाजता ग्रहण संपणार आहे. संपूर्ण ग्रहणाचा अवधी हा ३ मिनिटे ३४ सेकंद असेल. याचवर्षी ६ जानेवारी आणि २ जुलैला सूर्यग्रहण झाले होते.
वातावरणात मळभ
बुधवारी मुंबईसह पुणे, औरंगाबाद, सातारा भागांत पाऊस पडला. पुढील दोन दिवस ढगाळ वातावरणाचा आणि पावसाचा अंदाज आहे त्यामुळे वातावरणात मळभ असेल.
मग काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेची बी टीम नाही का? प्रकाश आंबेडकर
मंदिर बंद
ग्रहणामुळे अनेक ठिकाणी मंदिर काल रात्री लवकर बंद करण्यात आली आहेत. ग्रहण संपल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुली करण्यात येतील.