पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्भया प्रकरण: सुप्रीम कोर्टाने दोषी पवनची याचिका पुन्हा फेटाळली

पवन कुमार गुप्ता

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी पवनकुमार गुप्ताला पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे. पवनकुमार गुप्ताची याचिका सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फेटाळली आहे. गुन्हा घडला त्यावेळी आपण अल्पवयीन होतो, असा दावा करत पवन गुप्ताने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. ती याचिका सुप्रीम कोर्टाने याआधी फेटाळली होती. त्यानंतर पुन्हा पवनने सुप्रीम कोर्टात धाव घेत पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ती याचिका देखील कोर्टाने फेटाळली आहे.

निर्भया प्रकरणातील चारही दोषींच्या फाशीला स्थगिती

दरम्यान, निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींच्या फाशीच्या शिक्षेला दिल्लीतील पतियाळा हाऊस न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पुढच्या आदेशापर्यंत दोषींना फाशी देऊ नये असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. १ फेब्रुवारीला सकाळी सहा वाजता या प्रकरणातील चारही दोषींना फाशी देण्यात येणार होती. तिहार तुरुंगामध्ये त्यांना फाशी देण्यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. दोषींना फासावर लटकविण्यासाठी पवन जल्लाद तिहार तुरुंगात दाखल झाले आहेत. मात्र आता कोर्टाने फाशीच्या शिक्षेवर स्थगिती दिली आहे. 

भारतातील आर्थिक मंदीला जागतिक स्थितीही कारणीभूत