पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्भया प्रकरण: दोषी विनयने राष्ट्रपतींकडे पाठवली दया याचिका

विनय शर्मा

२०१२ च्या दिल्ली सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषी फाशी होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे. या प्रकरणातील दोषी विनय शर्मा याने देखील राष्ट्रपतींकडे दया याचिका पाठवली आहे. याआधी निर्भया प्रकरणातील दोषी मुकेश सिंह याने राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळल्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात दाखल केलेली याचिका बुधवारी कोर्टाने फेटाळली.

देशाविरोधी भाषण करणाऱ्या शरजीलची रवानगी पोलिस कोठडीत

दरम्यान, आणखी एक दोषी अक्षयसिंग ठाकूर याने सुप्रीम कोर्टात एक सुधारात्मक याचिका दाखल केली. जी याचिका कोर्टाने सुनावणीसाठी स्विकारली आहे. या प्रकरणात, सुप्रीम कोर्टातील पाच न्यायाधीशांचे खंडपीठ दोषी अक्षय ठाकूर याच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे. गुरुवारी दुपारी एक वाजता ही सुनावणी होणार आहे.

जामिया हिंसाचार: ७० संशयितांचे फोटो जारी करत पोलिसांनी ठेवले

निर्भया सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही दोषींना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. येत्या १ फेब्रवारीला चारही दोषींना फाशी देण्यात येणार आहे. मात्र फाशी होऊ नये यासाठी दोषी प्रयत्न करत आहेत. १६ डिसेंबर २०१२ रोजी निर्भयावर चालत्या बसमध्ये सहा जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर तिला चालत्या बसमधून फेकण्यात आले होते. 

कोरोना विषाणूः एअर इंडिया, इंडिगोच्या चीनला जाणाऱ्या विमानसेवा