पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्भयाच्या दोषींना फाशी

दोषींना फाशी

संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या बहुचर्चित निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही  दोषींना शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजता दिल्लीतील तिहार जेलमध्ये फाशी देण्यात आली. तब्बल सात वर्षांच्या दीर्घ न्यायालयीन संघर्षानंतर निर्भयाला आज न्याय मिळाला आहे, अशी भावना यावेळी निर्भयाच्या आईनं व्यक्त केली. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत फाशीची शिक्षा रोखण्यासाठी निर्भयाच्या चारही दोषींनी प्रयत्न केला. दिल्ली उच्च न्यायालयानं रात्री १२.०० वाजेच्या दरम्यान ही याचिका फेटाळून  लावत फाशीची शिक्षा कायम ठेवली.

 

कोरोनाशी लढ्यासाठी संकल्प आणि संयम दृढ करण्याची गरज : मोदी

अखेर साडेपाच वाजताच्या सुमारास  निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही  दोषी मुकेश सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि विनयकुमार सिंह यांना नराधमांना फाशी देण्यात आली. पहिल्यांदाच ४ जणांना एकाचवेळी फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. २००४ नंतर तब्ब्ल  १६ वर्षांनंतर फाशीची शिक्षा दिली गेली. 

कोरोनाशी लढा : PM मोदींकडून 'जनता कर्फ्यू'चं आवाहन

उशीरा का होईना आम्हाला न्याय मिळाला. हा दिवस भारताच्या तमाम मुलींसाठी आहे. त्यांना  अखेर फाशीची  शिक्षा मिळाली,  हा दीर्घ लढा होता. मी यासाठी न्यायव्यवस्था आणि सरकारचे आभार मानते अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईनं व्यक्त केली आहे. 

देशात कोरोनाचा चौथा बळी; पंजाबमध्ये उपचारादरम्यान एकाचा मृत्यू