पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्भया प्रकरणः दोषी मुकेशच्या याचिकेवर १६ मार्चला सुनावणी

दोषी मुकेशच्या याचिकेवर १६ मार्चला सुनावणी

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी मुकेश याच्या भावाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. चारही दोषींसमोरील कायदेशीर मार्ग बंद झाल्यानंतर दिल्लीतील पटियाला न्यायालयाने चारही दोषींना २० मार्च रोजी साडेपाच वाजता फासावर लटकवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायालयाच्या या निकालानंतर दोषी मुकेशचा भाऊ सुरेश याच्यावतीने वकील एम एल शर्मा यांनी याचिका दाखल केली आहे. 

पी. चिदंबरम यांनी भाजपला विचारला येस बँकेने दिलेल्या कर्जाचा हिशोब

मुकेशसाठी न्यायालयाकडून नियुक्त वकील वृंदा ग्रोवर यांनी  दबाव टाकून क्यूरेटिव्ह याचिका दाखल केल्याचा आरोप या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी असताना मुकेशवर यासाठी दबाव टाकण्यात आला. त्यामुळे मुकेशला नव्याने क्युरेटिव्ह याचिका आणि दया याचिका दाखल करण्याची संधी देण्यात यावी, असे या याचिकेत म्हटले आहे.  

देशातील आणखी तिघांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी

या याचिकेवर सोमवारी १६ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.   पटियाला हाऊस येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांच्या न्यायालयाने याप्रकरणी अनेक चढ-उतारानंतर चौथ्यांदा डेथ वॉरंट जारी केल्यानंतर याप्रकरणात पुन्हा एक याचिका दाखल करण्यात आली असून यावर सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:2012 Delhi gang rape case Supreme Court today fixed March 16 Monday to hear a petition filed by one of the Nirbhaya death row convicts Mukesh Singh