पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्भया प्रकरणः फाशीचा मार्ग मोकळा, दोषींची न्यायसुधार याचिका फेटाळली

सर्वोच्च न्यायालय

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींची न्यायसुधार याचिका (क्युरेटिव्ह पिटिशन) सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे दोषींना फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाने २२ जानेवारीला दोषींना फाशी देण्यासाठी डेथ वॉरंट जारी केले होते. फाशीची शिक्षा झालेले दोन दोषी विनय शर्मा आणि मुकेश सिंह यांनी न्यायसुधार याचिका दाखल केली होती.

२०१२ च्या सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणातील दोषी विनय आणि मुकेश यांच्या याचिकेवर न्या. रमण्णा यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला. या खंडपीठात न्या. अरुण मिश्रा, न्या. आरएफ नरिमन, न्या. आर भानुमती आणि न्या. अशोक भूषण यांचा समावेश होता.  

दरम्यान, मागील मंगळवारी दिल्लीच्या एका न्यायालयाने मुकेश (३२), पवन गुप्ता (२५), विनयकुमार शर्मा (२६) आणि अक्षय कुमार सिंह (३१) यांच्याविरोधात डेथ वॉरंट जारी केले आणि २२ जानेवारी सकाळी ७ वाजता तिहार कारागृहात फाशी देण्याचे निश्चित केले. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:2012 Delhi gang rape case Supreme Court dismisses curative petitions of Vinay Kumar Sharma and Mukesh Singh