पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नवे डेथ वॉरंट; निर्भयाच्या दोषींना ३ मार्चला सकाळी ६ वाजता फाशी

निर्भया प्रकरणातील आरोपी

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींविरोधात तिसऱ्यांदा डेथ वॉरंट जारी केले आहे. दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने दोषींना ३ मार्चला (मंगळवार) सकाळी ६ वाजता फाशी देण्याचे आदेश दिले आहेत. निर्भयाच्या कुटुंबीयांकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाने सुनावणी केली. दरम्यान, दोषीचे वकील एपी सिंह यांनी त्यांच्याकडे अजून कायदेशीर पर्याय उपलब्ध असल्याचे माध्यमांशी बोलतना म्हटले. माध्यमे, राजकारण्यांचा दबाव आहे. त्यामुळे फाशीची तारीख आली आहे, असेही ते म्हणाले. न्यायालयाच्या या निर्णयानंतर निर्भयाची आई आशादेवी यांनी समाधान व्यक्त केले. 

निर्भयाची आई आशादेवी म्हणाल्या की, मला आशा आहे की आता ३ मार्च ही अंतिम तारीख असेल. त्याचदिवशी गुन्हेगारांना फाशी दिली जाईल. 'देर है पर अंधेर नही', अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. हे सांगताना मागीलवेळेप्रमाणे त्यांच्यावर आनंद दिसून आला नाही. मी खूप संघर्ष केला आहे. माझ्या मुलीला न्याय मिळेल, अशी आता मला अपेक्षा आहे. 

दोषींच्या वकिलांनी त्यांच्याकडे अक्षयसाठी नव्या दया याचिकेचा पर्याय असल्याचे म्हटले. पवनकडेही क्यूरेटिव्ह पिटिशन आणि राष्ट्रपतीकडील दया याचिकेचा पर्याय उपलब्ध असल्याचे ते म्हणाले. 

दरम्यान, याप्रकरणातील आणखी एक दोषी मुकेशने न्यायाधीशांकडून नियुक्त न्यायमित्र वृंदा ग्रोवर यांनी आपली बाजू मांडू नये, असे म्हटले आहे. त्यानंतर न्यायालयाने मुकेशच्या मागणीनुसार अधिवक्ता रवी काजी यांनी त्यांची बाजू मांडण्यासाठी नियुक्त केले आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:2012 Delhi gang rape case Delhi court has issued fresh death warrant against all the four convicts on March 3 at 6 am