निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींच्या फाशीच्या शिक्षेला दिल्ली न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पुढच्या आदेशापर्यंत फाशी देऊ नये असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. १ फेब्रुवारीला सकाळी सहा वाजता या प्रकरणातील मुकेश सिंह, पवनकुमार गुप्ता, अक्षय ठाकूर आणि विनय शर्मा या चारही दोषींना फाशी देण्यात येणार होती.अतिरिक्त सत्र न्यायाधीश धमेंद्र राणा यांनी चार दोषींच्या अर्जावरील सुनावणी दरम्यान त्यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली. दिल्लीतील पटियाला न्यायालयात दोषींनी फाशीच्या स्थगितीची याचिका दाखल केली होती.
2012 Delhi gang-rape case: A Delhi Court stays execution of convicts till further orders pic.twitter.com/jdg28SSDmN
— ANI (@ANI) January 31, 2020
निर्भया प्रकरण: सुप्रीम कोर्टाने दोषी पवनची याचिका पुन्हा फेटाळली
दोषी अक्षय ठाकुर, विनय शर्मा आणि पवन गुप्ता याच्या वकिलांनी न्यायालयात दोषींची बाजू मांडली. दोषी आरोपी हे दहशतवादी नाहीत, असे ते यावेळी म्हणाले. जेल नियमावलीतील ८३६ नियमानुसार, एकापेक्षा अधिक लोकांना मृत्यूदंडाची शिक्षा करताना त्यांना कायद्याचे सर्व पर्याय खुले असेपर्यंत फाशी देता येत नाही, असा दाखलाही दोषींच्या आरोपींनी दिला.
विकासदर ६ ते ६.५ टक्के राहिल, आर्थिक सर्वेक्षण अहवालात अंदाज
तिहार जेलमधील अधिकाऱ्यांनी ही यावेळी बाजू मांडली. एकाच दोषीची दया याचिका दाखल करण्यात आली आहे. केवळ यावर निर्णय झालेला नाही. त्याच्याशिवाय अन्य दोषींना फाशी दिली जाऊ शकते, असे सांगितले. एकाच्या दया याचिकेवरील सुनावणी झाली नसताना इतर दोषींना फाशी देता येणार नाही, असा युक्तिवाद दोषींच्या वकिलांनी केला.