पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्भया प्रकरण: चारही दोषींना फासावर लटकवले जाणार?

निर्भया प्रकरणातील आरोपी

दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना फासावर लटकवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. चारही दोषींना फाशीची शिक्षा देण्यापूर्वी ट्रायल कोर्टाकडून ब्लॅक वॉरंट घ्यावे लागणार आहे. हे वॉरंट आल्यानंतर पुढच्या १५ दिवसांमध्ये चारही दोषींना फाशीची शिक्षा दिली जाऊ शकते. तिहार जेल अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत राष्ट्रपतींनी याप्रकरणातील दोषींची दया याचिका फेटाळली नाही. दरम्यान, अशी देखील चर्चा सुरु आहे की १६ डिसेंबरच्या आधीच याप्रकरणातील चारही दोषींना फाशी दिली जाऊ शकते. 

'शिवसेनेने विधेयकाच्या बाजूने मतदान केले हे योग्य नाही'

कारागृह अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, 'जोपर्यंत दया याचिकेची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत ब्लॅक वॉरंट दिले जाऊ शकत नाही. निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणामध्ये विनय, अक्षय, पवन आणि मुकेश हे चौघे जण दोषी आहेत. दरम्यान, या प्रकरणातील दोषी पवनला तिहार जेलमध्ये हलवण्यात आले आहे. याआधी पवन मंडोली जेलमध्ये बंद होता. बाकीचे तिन्ही दोषी तिहार जेलमध्येच आहेत. 

... तर अमित शहांवर अमेरिकेने निर्बंध घालावेत

बिहारच्या बक्सर जेलला फाशीसाठी १० विशेष दोऱ्या बनवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या आठड्याच्या शेवटी या दोऱ्या तयार ठेवण्यास सांगितले आहे. या सूचनेनंतर दोऱ्या तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. फाशी देण्यासाठी वापरल्या जाणारी दोरी तयार करण्यासाठी बक्सर जेल देशात प्रसिध्द आहे. संसद हल्ल्यातील आरोपी अफजल गुरुला फाशी देण्यासाठी जी दोरी वापली होती ती याच जेलमध्ये तयार करण्यात आली होती. 

शिवसेनेसोबत जाण्याच्या काँग्रेसच्या निर्णयाचा अमित शहांकडून असा

सात वर्षापूर्वी म्हणजे १६ डिसेंबर २०१२ रोजी निर्भयावर चालत्या बसमध्ये सहा जणांनी सामुहिक बलात्कार केला होता. सहा पैकी एक आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याला सोडण्यात आले होते. तर याप्रकरणातील दुसरा आरोपी रामसिंह याने तिहार जेलमध्ये आत्महत्या केली होती. तर या प्रकरणातील उर्वरीत चारही दोषींना फाशीची शिक्षा दिली जावी अशी मागणी देशभरातून केली जात आहे.  

अहमदनगरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांना विषबाधा; दोघांचा मृत्यू