पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हिंसाचारानंतर एका भागातूनच गोळा केले २ हजार किलो विटांचे तुकडे

कर्दमपुरी

सुधारित नागरिकत्त्व कायद्यावरून पेटलेली ईशान्य दिल्ली आता थंड होऊ लागली आहे. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार दिल्ली हिंसाचारात ३८ जणांचा मृत्यू झाला. हिंसाचार शांत झाल्यानंतर गुरुवारपासून दंगलग्रस्त भागातील रस्त्यांची सफाई करण्यास ईशान्य दिल्ली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सुरुवात केली. या साफसफाई दरम्यानं केवळ कर्दमपुरी या एका दंगलग्रस्त भागातूनच २ हजार किलो विटांचे तुकडे गोळा करण्यात आले आहेत. 

 

दिल्ली हिंसाचार : पोलिस दलात मोठे फेरबदल होण्याचे संकेत

 याव्यतिरिक्त दगड, काचा, जळालेले टायर, फर्निचर, कपडेदेखील स्त्यावर विखुरले आहेत. हा सर्व कचरा पिशव्यांत बांधून रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आला आहे.  गुरुवारपासून भजनपुरा, यमुना विहार, जाफराबाद, खजूरियां खास या दंगलग्रस्त भागात साफसफाईस सुरुवात करण्यात आली आहे. हिंसाचारात झालेल्या दगडफेक, जाळपोळ, हाणामारीत काचा, दगड, विटांचे तुकडे आजूबाजूच्या परिसरात विखुरले आहेत ते आधी साफ करण्यात येणार आहेत. 

दिल्ली हिंसाचार : पश्चिमी उत्तर प्रदेशातून आणल्या गेल्या गावठी पिस्तूल

 तर हिंसाचारात जाळलेल्या दुचाकी आणि चारचाकी देखील रस्त्यावरून नंतर हटवण्यात येणार आहेत. जळालेल्या वाहनांची पुराव्यासाठी चित्रफिती तयार करण्यात येणार आहेत. वाहन चालकांना विम्यासाठी त्याची गरज भासू शकते असे पोलिसांनी सांगितलं.