पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बस-ट्रकच्या अपघातानंतर भीषण आग; २० जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश बसला भीषण आग

उत्तर प्रदेशच्या कन्नौजमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. प्रवासी बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात होऊन आग लागली. या अपघातामध्ये १८ ते २० जणांचा मृत्यू झाला आहे. तर २१ जण जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या बसमधून ४३ प्रवासी प्रवास करत होते. ही बस गुरसहायगंज येथून जयपूरकडे जात होती.

नागरिकत्व सुधारणा कायदा देशात लागू; केंद्राकडून अधिसूचना जारी

कनौजमधील गुरसहायगंड येथून जयपूरला जाणाऱ्या बसला शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अपघात झाला. प्रवासी बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. अपघातानंतर बस आणि ट्रकला भीषण आग लागली. अचानक आग लागल्यामुळे बसमधील प्रवाशांना तात्काळ बाहेर पडता आले नाही. तरी सुध्दा काही प्रवाशांनी बसमधून उड्या मारल्या.

चंद्रग्रहण २०२०: आकाशातील अद्धभूत नजारा 

कानपूरचे आयजी मोहित अग्रवाल यांनी सांगितले की,  बसला लागलेल्या आगीमध्ये १८ ते २० प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या आगीमध्ये मृत्यू झालेल्या प्रवाशांचे मृतदेह पूर्णपणे जळून गेले आहेत. त्यामुळे त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. डीएनए चाचणी करुन मृतांची ओळख पटवावी लागणार आहे. त्यानंतरच मृतांचा आकडा स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. 

PHOTO: मुंबईत असे दिसले चंद्रग्रहण!

या बसमधून प्रवास करणारे २६ प्रवासी गुरसहायगंज येथील होते. तर १७ प्रवासी छिबरामऊ येथील होते. नायट्रोजन गॅसचा टायर फुटल्यामुळे बसलाला आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज परिवहन विभागाने वर्तवला आहे. टायर फुटल्याने आग लागली आणि डिझेलमुळे भडका उडाला. बसला धडक दिलेल्या ट्रकमध्ये प्लास्टिक भरले होते.

IND vs SL: मालिका व सामनाही टीम इंडियाच्या खिशात

फॉरेन्सिकचे पथकाकडून तपास सुरु असून बसमधील मृतांचे अवशेष काढले जात आहे. या बसला सील करण्यात आले आहेत. या अपघातानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख आणि जखमींना ५० हजारांची मदत उत्तर प्रदेश सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. 

माझ्यावर हल्ला कसा झाला याचे पुरावे आहेत: आयशी घोष