पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

केरळमध्ये पूरबळींची संख्या 28 वर; कोची विमानतळ बंद

कोची विमानतळावर पाणी

केरळमधील सर्वाधिक वर्दळीचे असलेले कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुराचे पाणी आल्यामुळे येत्या रविवारी दुपारी तीन वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कालपासूनच कोची विमानतळावरील हवाई वाहतूक बंद करण्यात आली आहे. संपूर्ण धावपट्टीवर पुराचे पाणी आले आहे. गेल्यावर्षीही या विमानतळावर पुराचे पाणी आल्यामुळे दोन आठवडे ते बंद ठेवण्यात आले होते.

पंचगंगेच्या पाणी पातळीत घट, पण कोल्हापुरात पूरस्थिती अद्याप कायम

केरळमधील पूरस्थिती गंभीर बनली असून, आतापर्यंत 28 जणांचा पुरामध्ये बळी गेला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर 27 जण जखमी आणि 7 जण बेपत्ता झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री पी विजयन यांनी दिली आहे. केरळमधील वायनाडमध्ये दरड कोसळल्यामुळे अनेक जण त्याखाली अडकले आहेत. याठिकाणी मदतकार्य वेगाने सुरू आहे. वायनाड हा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा मतदारसंघ आहे. याच ठिकाणी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. या ठिकाणी अनेक जण बेपत्ता झाले आहेत.

वायनाड आणि इडुक्की या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे पर्यटकांनी 15 ऑगस्टपर्यंत या ठिकाणी येऊ नये, असे आवाहन राज्य प्रशासनाने केले आहे. गेल्या 24 तासांत या ठिकाणी तब्बल 18 ते 20 सेंटिमीटर इतका पाऊस पडला आहे.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मराठी कलाकार सरसावले

देशाच्या अनेक भागात सध्या पूरस्थिती आहे. कर्नाटक, गुजरात, ओडिशा, आसाम, बिहार आणि महाराष्ट्र या ठिकाणी अनेक भागात पूर आला असून, लाखो लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.