पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बोअरवेलमध्ये अडकलेल्या २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, ७५ तासांचे प्रयत्न अयशस्वी

बोअरवेलमध्ये पडलेल्या २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

गेल्या ७५ तासांहूनही अधिक काळ तामिळनाडूच्या त्रिचीजवळ बोअरवेलमध्ये पडलेल्या दोन वर्षीय सुजित विल्सनला वाचवण्याचे अथक प्रयत्न अपयशी ठरले आहेत. मंगळवारी सकाळी त्याला मृत घोषीत करण्यात आले. शुक्रवार संध्याकाळपासून हा चिमुकला बोअरवेलमध्ये अडकून होता. त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात होते. 

इक्बाल मिर्चीसंबधीत प्रकरणावरून शिल्पा शेट्टीच्या पतीला ईडीची नोटीस

सुजित सुखरुप बाहेर यावा यासाठी देशवासीयांनी प्रार्थना केल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील सुजीतसाठी प्रार्थना केली होती. मात्र ७५ तासांच्या अथक प्रयत्नानंतरही त्याचा वाचवण्यासाठी बचाव पथकाला अपयश आले आहे.

सुजित ६०० फुट खोल उघड्या बोअरवेलजवळ खेळत होता.  शुक्रवारी तो खेळताना  बोअरवेलमध्ये २०  फूट खोल कोसळला. शनिवारी बोअरवेअरमधून निसटून तो ८८ फूट आणखी खोल गेला. शुक्रवारपासून सुजितला वाचवण्यासाठी एनडीआरएफ, तामिळनाडू पोलिस, एसडीआरफचे ८०० लोक शर्थीचे प्रयत्न करत होते. मात्र मंगळवारी पहाटे आपातकालीन व्यवस्थापकिय अधिकाऱ्यांनी सुजितचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. 

सोपोरमध्ये बस स्थानकाजवळ दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, ९ जण जखमी