पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुलवामामध्ये IED स्फोटात जखमी झालेले दोन जवान शहीद

स्फोटानंतर जवानांनी संपूर्ण परिसर रिकामा केला होता.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये सोमवारी संध्याकाळी दहशतवाद्यांकडून आयईडीच्या साह्याने घडवून आणण्यात आलेल्या स्फोटात जखमी झालेले दोन जवान मंगळवारी शहीद झाले. पुलवामामध्ये या आधी ज्या पद्धतीने हल्ला घडवून केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांना लक्ष्य करण्यात आले होते. त्याच पद्धतीने सोमवारी हा स्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

पुलवामामध्ये सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले जवान सैन्यदलाच्या ट्रकजवळ उभे होते. याच ट्रकजवळ असलेल्या एका गाडीमध्ये दहशतवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला. या हल्ल्यात जवान गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने सैन्यदलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

काश्मिरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार, एक जवानही शहीद

भारतीय सैन्यदलाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुलवामातील स्फोटात गंभीर जखमी झालेले दोन जवान सोमवारी संध्याकाळी सैन्यदलाच्या ९२ बेस रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाबद्दल आम्ही शोक व्यक्त करतो.

आयईडी स्फोटामध्ये नक्की किती जवान जखमी झाले होते, याची माहिती सैन्यदलाच्या प्रवक्त्याने काल दिली नव्हती. दहशतवाद्यांचा मोठा स्फोट घडवून आणण्याचा इरादा होता. पण जवानांच्या सतर्कतेमुळे ते हा स्फोट मोठ्या प्रमाणात घडवून आणू शकले नाही, असेही या प्रवक्त्याने म्हटले आहे.