पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नेपाळी दिसतात म्हणून दोन बहिणींना पासपोर्ट नाकारला

भारतीय पासपोर्ट

पंजाबमधील अंबाला शहरातून एक वेगळीच बातमी पुढे आली आहे. केवळ नेपाळी लोकांसारख्या दिसत असल्यामुळे दोन बहिणींना पासपोर्ट (पारपत्र) देण्यास तेथील अधिकाऱ्यांनी नकार दिला. विशेष म्हणजे या दोन्ही बहिणींनी पासपोर्टसाठी केलेल्या अर्जावर त्या नेपाळी लोकांसारख्या दिसतात असे लिहिण्यात आले आहे. या दोघींनी चंदीगढमधील पासपोर्ट कार्यालयात अर्ज केला होता. त्यावेळी त्यांना हा अनुभव आला. संतोष आणि हिना अशी या बहिणींची नावे आहेत.

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; आंबिवलीजवळ डंपरची रेल्वेगेटला धडक

या दोन्ही बहिणींना पासपोर्ट देण्यास नकार देण्यात आल्यानंतर हरियाणातील गृहमंत्री अनिल वीज यांनी यामध्ये हस्तक्षेप केला असून, या दोन्ही अर्जदारांना पासपोर्ट देण्याची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष आणि हिना या दोघींकडे पासपोर्ट तयार करण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे होती. त्यांच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पदवी प्रमाणपत्रही होते. पण पासपोर्ट विभागातील अधिकाऱ्यांनी त्यांची कागदपत्रे बघितलीच नाही. केवळ त्या नेपाळी लोकांसारख्या दिसताहेत असे सांगून त्यांना पासपोर्ट देण्यास नकार दिला.

राहुल गांधी अन् प्रियांका गांधी यांना अमित शहांनी दिले चॅलेंज

पासपोर्ट काढण्यासाठी संतोष आणि हिना काही दिवसांपूर्वी चंदीगढमधील कार्यालयात गेल्या होत्या. त्यांनी रितसर अर्ज केला होता. पण त्यांच्या अर्जावर अर्जदार नेपाळी दिसत आहेत, असे शेरा अधिकाऱ्यांनी मारला. या नंतर या दोन्ही बहिणींनी हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क केला. त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना या प्रकरणामध्ये लक्ष घालण्यास सांगितले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:2 sisters from haryana say denied passport by chandigarh passport official as they looked like nepalis