पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्लीपर्यंत पोहोचला कोरोना विषाणू, देशात २ रुग्ण पॉझिटिव्ह

दिल्लीपर्यंत पोहोचला कोरोना विषाणू

सध्या चीन, दक्षिण कोरियामध्ये धुमाकूळ घालत असलेला कोरोना विषाणू आता देशाची राजधानी दिल्लीत पोहोचला आहे. दिल्लीत कोरोना विषाणूचे पहिले प्रकरण समोर आले आहे. आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. त्याचबरोबर तेलंगणातूनही एक रुग्ण कोरोनाने पीडित आढळून आला आहे. 

कोरोनाचा आता युरोपमध्ये वेगाने फैलाव, इटलीमध्ये चिंतेची स्थिती

दिल्लीत जो कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे, तो इटलीतून आला होता, असे सांगण्यात येते. दुसरा व्यक्ती दुबईतून आला आहे. यापूर्वी केरळमध्ये कोरोना विषाणूचे ३ रुग्ण समोर आले होते. 

कोरोना पीडित रुग्णांवर बारीक लक्ष ठेवण्यात आल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले. सध्या दोन्ही रुग्णांची स्थिती स्थिर आहे. यापूर्वी चीनमधून आणण्यात आलेल्या भारतीय नागरिकांना मानेसर सेंटरमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. या लोकांना कोणालाही भेटण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. तर परदेशातून आलेल्या प्रवाशांना विमानतळावर थर्मल स्क्रिनिंग केले जात आहे. 

नुकताच जपानमधून 'डायमंड प्रिसेंज' क्रूझमधून भारताच्या ११९ नागरिकांना बाहेर काढण्यात आले होते. या सर्व लोकांना भारतात आणल्यानंतर त्यांना थेट मानेसर सेंटरमध्ये नेण्यात आले आहे. डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. भारतात आतापर्यंत कोरोनामुळे कोणत्याही व्यक्ती दगावलेला नाही. 

निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी पवन गुप्ताची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

यापूर्वी केरळमध्ये कोरोनाचे तीन प्रकरणे समोर आली. सध्या तिघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते.