पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली हिंसाचार प्रकरणात अटक केलेल्या २ पैकी एका PFI सदस्यानं लढवली होती विधानसभा

दिल्ली हिंसाचार

दिल्ली पोलिसांनी गेल्या महिन्यात उसळलेल्या हिंसाचारास निधी पुरवल्या प्रकरणी  पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय)चे अध्यक्ष आणि  सचिव या दोघांना अटक केली आहे.  मोहम्मद इलिआज आणि परवेझ अहमद या दोघांनाही दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं गुरुवारी अटक केल्याचं समजत आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी मोहम्मद इलिआज  हा शिव विहारचा रहिवाशी असून त्यानं २०२० ची दिल्ली विधानसभा  एसडीपीआय पक्षाकडून लढवली होती. 

ज्योतिरादित्य शिंदेंच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसमधील तरूण नेते अस्वस्थ

अहमद हा दिल्लीच्या पीएफआयचा  अध्यक्ष आहे  तर मोहम्मद  हा सचिव आहे. ईशान्य दिल्लीत उसळलेल्या हिंसाचाराला निधी पुरवणाऱ्या दोन व्यक्तीची ओळख पटली असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी लोकसभेत बोलताना सांगितलं, त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही कारवाई करून पीएफआयशी निगडीत या दोघांना अटक करण्यात आली. गेल्या महिन्यात दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारात ५० जणांचा मृत्यू झाला होता तर २०० जण जखमी झाले होते. या हिंसाचारास आर्थिक मदत पुरवल्याचा आरोप पीएफआयवर आहे.
कोरोना विषाणू इफेक्ट; अर्थसंकल्पीय अधिवेशन शनिवारपर्यंतच

दिल्लीबरोबरच देशातही अनेक ठिकाणी झालेल्या नागरिकत्त्व कायद्याच्या विरोधातील आंदोलनाला निधी पुरवल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनानं देखील या संस्थेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी पीएफआयशी निगडीत मोहद दानिश नावाच्या सदस्यास दिल्ली हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आली होती. सुधारित नागरिकत्त्व कायद्याविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात पीएफआयचा मोठा सहभाग असल्याची माहिती दानिशनं दिल्ली पोलिसांना दिली होती असं वृत्त एएनआय वृत्तसंस्थेनं प्रकाशित केलं होतं.

३६५ दिवस शिवजयंती साजरी केली पाहिजेः राज ठाकरे

यापूर्वी पोलिसांनी दिल्ली हिंसाचार प्रकरणात ताहिर हुसैन आणि त्याच्या भावालाही अटक केली आहे. दिल्लीतील न्यायालयाने ताहिर हुसैन याला सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.