पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO: कोरोना रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा, डान्स करत डॉक्टरांचे सेलिब्रेशन

डॉक्टरांचा डान्स

चीनसह संपूर्ण जग जीवघेण्या कोरना विषाणूविरोधात लढत आहे. या जीवघेण्या आजारातून रुग्णाला वाचवणे हे यशापेक्षा कमी नाही. अशातच चीनमध्ये सहा कोरोना रूग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर आनंद व्यक्त करत डॉक्टरांनी डान्स केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

मराठीचं वाकडं करण्याची हिंमत कुणातही नाही: मुख्यमंत्री

पीपल्स डेली चायनाद्वारे ट्वीट करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये दोन डॉक्टर रुग्णालयाबाहेर डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना लोकांनी डॉक्टरांच्या या यशाचे कौतुक केले आहे. तसंच त्यांनी कोरोना विषाणूचा सामना करणाऱ्या चीनसाठी प्रार्थना सुद्धा केली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

कुणाल कामरावरील प्रवास बंदी इंडिगोकडून ३ महिन्यांनी कमी

दरम्यान, चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आतापर्यंत कोरोनाने २ हजार ७१५ जणांचा बळी घेतला आहे. तर ८७ हजार नागरिकांना या विषाणूची लागण झाली आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनफिंग यांनी बुधवारी सांगितले की, 'या विषाणूमुळे सर्वात जास्त प्रभावित झालेल्या वुहान शहराची स्थिती बिकट झाली आहे.' तर कोरोना विषाणूमुळे जगभरातील सर्वच देशांमध्ये भितीचे वातावरण आहे.

दिल्ली हिंसाचार : पोलिस दलात मोठे फेरबदल होण्याचे संकेत

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:2 medical workers dance ballet in front of a hospital to celebrate the recovery of six more corona patients