पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनात तिघांचा मृत्यू, अनेक जखमी

अनेक तरूण या आंदोलनांमध्ये सहभागी झाले होते.

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात कर्नाटकमधील मंगळुरूमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चाला गुरुवारी हिंसक वळण लागले. यामध्ये दोन आंदोलकांचा मृत्यू झाला. तर उत्तर प्रदेशात लखनऊमध्येही एका आंदोलकाचा मृत्यू झाला. सध्या देशाच्या विविध भागात या कायद्याविरोधात आणि प्रस्तावित राष्ट्रीय स्तरावरील नागरिकत्व नोंदणीवरून आंदोलन सुरू आहे. गुरुवारी राजधानी दिल्लीमध्येही या आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागल्यामुळे उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये अनेक जण जखमी झाले आहे. जखमीमध्ये पोलिसांचाही समावेश आहे.

सरकार भारताचा आवाज दाबू शकत नाही : राहुल गांधी

मंगळुरूमध्ये या कायद्याविरोधात निघालेल्या मोर्चाला हिंसक वळण लागल्यानंतर आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यामध्ये जलील (४९) आणि नौशिन (२३) जखमी झाले. उपचारांवेळी त्यांचा मृत्य झाला. लखनऊमध्ये पोलिसांनी आंदोलकांना रोखताना मोहम्मद वकील यांचा मृत्यू झाला. दरम्यान, वकील यांच्या मृत्यूशी पोलिसांचा काहीही संबंध नसल्याचे उत्तर प्रदेशच्या पोलिस महासंचालकांनी म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे.

प्रियम गर्ग १ कोटी ९० लाख, जाणून घ्या कोणाला कुणी अन् किती पैसे मोजले

गुरुवारी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात २४ राज्यांतील ५६ शहरांमध्ये आंदोलन करण्यात आले. यापैकी अनेक ठिकाणी आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. आंदोलनावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी देशाच्या अनेक भागात गुरुवारी मोबाईल सेवा, इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.