पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आपलंच हेलिकॉप्टर पाडलं: ६ अधिकाऱ्यांवर हवाईदलाची कारवाई

आपलेच हेलिकॉप्टर एमआय-१७ चुकीने पाडल्याप्रकरणी भारतीय हवाईदलाने आपल्या सहा अधिकाऱ्यांवर कारवाई केली

आपलेच हेलिकॉप्टर एमआय-१७ चुकीने पाडल्याप्रकरणी भारतीय हवाईदलाने आपल्या सहा अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. यामध्ये दोन अधिकाऱ्यांना कोर्ट मार्शलचा सामना करावा लागेल. २६ फेब्रुवारीला बालाकोट एअर स्ट्राईकच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने भारतीय लष्कराच्या ठिकाणांवर हवाई हल्ले करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. त्याच दिवशी भारतीय हवाई दलाने चुकीने आपलेच एक हेलिकॉप्टर पाडले होते. यामध्ये ६ अधिकारी शहीद झाले होते. 

या प्रकरणी २ अधिकाऱ्यांना कोर्ट मार्शलचा सामना करावा लागेल. उर्वरित ४ अधिकाऱ्यांना प्रशासकीय कारवाईला सामोरे जावे लागेल. या अधिकाऱ्यांमध्ये २ एअर कमोडोर (लष्कराच्या ब्रिगेडिअर समकक्ष) आणि २ फ्लाइट लेफ्टनंट (लष्करातील कॅप्टन समकक्ष) यांचा समावेश आहे. संरक्षण सूत्रांनी 'एएनआय'ला दिलेल्या माहितीनुसाल एक ग्रुप कॅप्टन आणि एक विंग कमांडरला कोर्ट मार्शलला सामोरे जावे लागणार आहे.

पीएमसी बँकेच्या ग्राहकांना दिलासा, ४० हजार काढता येणार

२७ फेब्रुवारीला जेव्हा पाकिस्तानी हवाईदलाने भारतीय लष्कराच्या ठिकाणांवर हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. त्यावेळी श्रीनगरजवळील बडगाम येथे एमआय-१७ कोसळले होते. सुरुवातीला हा अपघात मानला गेला होता. पण नंतर या हेलिकॉप्टरवर श्रीनगरमधील तैनात असलेल्या भारताच्याच एअर डिफेन्स सिस्टिम स्पायडरने निशाणा साधला होता. उड्डाण केल्यानंतर १० मिनिटांतच हे हेलिकॉप्टर पाडण्यात आले होते.