पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्लीत २ कॉन्ट्रॅक्ट किलरना अटक, मुंबईतील व्यावसायिकाने दिली होती सुपारी

दिल्लीत गोळीबारानंतरचे घटनास्थळाचे छायाचित्र

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पूर्व दिल्लीमधून दोन कॉन्ट्रॅक्ट किलरना अटक केली आहे. पैशांची सुपारी घेऊन एखाद्या व्यक्तीला मारण्यासाठी हे कॉन्ट्रॅक्ट किलर कुख्यात आहेत. मुंबईतील एका व्यावसायिकाने दिल्लीमध्ये दोघांना मारण्यासाठी सुपारी दिली होती. त्यासाठी हे दोघे दिल्लीमध्ये आले होते. त्यांनी शहादरा भागामध्ये गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी त्यांना पकडले.

नवी मुंबईत शिवसेनेला धक्का; 200 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

पोलिस आणि या गुन्हेगारांमध्ये झालेल्या चकमकीत एका गुन्हेगाराच्या पायाला गोळी लागल्यामुळे त्याला दुखापत झाली आहे. या संदर्भात विशेष शाखेच पोलिस उपायुक्त संजीव कुमार यादव म्हणाले, मुंबईतील व्यावसायिकाला दिल्लीमध्ये एका महिलेला ठार मारायचे होते. वैयक्तिक कारणामुळे त्याला हे करायचे होते. त्यासाठीच ही सुपारी देण्यात आली होती. 

अटक केलेल्या दोन्ही गुन्हेगारांकडे आम्ही चौकशी करीत आहोत. त्यांना या हत्या घडवून आणण्यासाठी पैसे नक्की कुठून मिळाले होते, याचा शोध घेत आहोत. एकदा सगळी माहिती तपासल्यानंतर आम्ही गरज पडल्यास मुंबईतील त्या व्यावसायिकाला अटक करू किंवा त्यांच्याकडेही चौकशी करू, असे संजीवकुमार यादव यांनी सांगितले.

पावसाळा संपला, राज्यात सरासरीपेक्षा जास्त तर पुण्यात रेकॉर्डब्रेक पाऊस

ताज मोहम्मद ऊर्फ ताजू (२१), लियाकत अली (४८) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ताज हा उत्तर प्रदेशमधील तर लियाकर हा हरियाणातील राहणार आहे.