पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

१९९८ ते २०१४ : एक्झिट पोल किती बरोबर किती चुकीचे ठरले...

संग्रहित छायाचित्र

गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू असलेली सात टप्प्यांतील लोकसभा निवडणुकीची मतदानाची प्रक्रिया अखेर आज पूर्ण होईल. संध्याकाळी सहा वाजता सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पूर्ण होईल. त्यानंतर अर्थातच सगळ्यांचे लक्ष एक्झिट पोल काय सांगतात याकडे लागेल. अर्थात हे अंदाज असतील, खरे चित्र गुरुवारी २३ मे रोजी मतमोजणी झाल्यावरच स्पष्ट होईल.

मतदान केल्यानंतर काही निवडक मतदारांशी बोलून एक्झिट पोल तयार केले जातात. आपण कोणत्या पक्षाला मत दिले हे मतदात्याने बाहेर आल्यावर नीटपणे आणि खरेपणाने सांगितल्यास हे अंदाज अचूक ठरण्याची शक्यता बळावते. पण प्रत्येकवेळी एक्झिट पोलचे निकाल बरोबर येतातच, असे नाही. अनेकवेळा एक्झिट पोलचे निकाल चुकीचेही ठरलेले आहेत. १९९८ आणि २०१४ च्या निवडणुकीत एक्झिट पोलचे निकाल बऱ्यापैकी बरोबर आले होते.

१९९९ मध्ये तत्कालिन पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार पडल्यानंतर त्यावेळी झालेल्या निवडणुकीत एक्झिट पोलनी तेव्हाच्या एनडीए सरकारला ३१५ पेक्षा जास्त जागा दाखवल्या होत्या. पण प्रत्यक्षात एनडीएच्या जागा २९६ इतक्याच राहिल्या होत्या. 

एक्झिट पोलची आतापर्यंतची आकडेवारी आणि प्रत्यक्षात निवडून आलेल्या जागा

एक्झिट पोल