पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच्या १९ आमदारांचे राजीनामे

राजीनामा दिलेले मध्य प्रदेशमधील आमदार

काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर मध्य प्रदेशमध्ये पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग मिळाला. मध्य प्रदेशमध्ये सहा मंत्र्यांसह एकूण १९ आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांच्याकडे राजीनामा पाठविण्यात आला आहे. राजभवनाकडून याला दुजोरा देण्यात आला. लालजी टंडन हे होळीनिमित्त मंगळवारी लखनऊमध्ये आहेत. 

ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा

मंगळवारी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्या मंत्र्यांमध्ये तुलसी सिलावत, प्रद्युम्नसिंह तोमर, महेंद्र सिसोदिया, गोविंद राजपूत, इम्रती देवी यांचा समावेश आहे. मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे सरकार अल्पमतात आहे. त्यांच्याकडे विधानसभेत बहुमत नाही, हे राज्यपालांना सांगण्यासाठीच त्यांच्याकडे राजीनामा पाठविण्यात आला आहे, असे राजीनामा दिलेल्या आमदारांनी म्हटले आहे. 

पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती स्थिर, आणखी काही निरीक्षणाखाली

मध्य प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय तिढा निर्माण झाला आहे. त्यातच सोमवारी रात्री काही मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. मंगळवारी सकाळी ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा उपस्थित होते. या तिन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. त्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांचा राजीनामा समोर आला. आता १९ आमदारांनी राजीनामा दिल्याचे समोर आले आहे.