पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चीनमुळे आज १८४ देशांना नरकयातना भोगाव्या लागताहेत - डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

कोरोना विषाणूचे संक्रमण सुरुवातीच्या टप्प्यातच रोखण्यात चीन अपयशी ठरल्यामुळे आज १८४ देशातील नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागताहेत, अशी टीका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. कोरोना विषाणू संक्रमणामुळे अमेरिकेत सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेने चीनमधील आपली विविध वस्तू उत्पादनाची कामे थांबवावीत, अशी मागणी अमेरिकेतील काँग्रेस सदस्यांकडून केली जाते आहे.

राज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू

कोरोना विषाणूच्या जागतिक संक्रमणाला चीनच जबाबदार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प सातत्याने सांगताहेत. या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. या जागतिक महामारीला चीनच जबाबदार असल्याचे सांगत नुकसानभरपाई म्हणून चीनने १४० अब्ज डॉलर द्यावेत, असे जर्मनीने म्हटले आहे. पण चीनकडून आणखी मोठी नुकसानभरपाईची मागणी करण्याच्या विचारात असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

पाकला अगोदर चीनने वाचवले अन् आता कोरोनाजन्य परिस्थितीनं

चीनने सुरुवातीच्या टप्प्यातच या विषाणूबद्दल जगातील सर्व देशांना सविस्तर माहिती दिली असती तर आज जेवढी हानी झाली आहे, अर्थव्यवस्थेला जे धक्के बसले आहेत, ते बसले नसते, असे अमेरिका, इंग्लंड आणि जर्मनीच्या नेत्यांनी आधीच म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, १८४ देशांमध्ये या विषाणूचे संक्रमण झाले आहे. हे खरंच भयानक आहे. विचार करण्यापलीकडचे आहे.