पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अयोध्या निकालादिवशी १८३ जणांना नजरकैदेत ठेवणार

अयोध्या निकालादिवशी १८३ जण राहणार नजरकैदेत

अयोध्या प्रकरणी ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईल. त्या दिवशी बसपाचे माजी आमदार योगेश वर्मांसह १८३ लोक नजरकैदेत ठेवले जाणार आहे. योगेश वर्मा २ एप्रिल २०१८ मध्ये भारत बंद दरम्यान मीरतमध्ये हिंसाचार प्रकरणात आरोपी आहेत. या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडण्यात आली आहे. या प्रकरणात जेवढ्या लोकांना तुरुंगवारी करावी लागली होती. त्या सर्वांना नजरकैदेत ठेवण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. चिथावणीखोर संदेश व्हायरल होऊ नये म्हणून पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारी निर्णयाच्या दिवशी इंटरनेट सेवा बंद करण्याच्या विचारात आहेत. 

महाराष्ट्राला लागलेले ग्रहण लवकरच सुटणार, संजय राऊत यांचे सूचक

एसएसपी अजय साहनी म्हणाले की, २ एप्रिल २०१८ मध्ये भारत बंद दरम्यान मीरतमध्ये हिंसाचार झाला होता. शोभापूर पोलिस चौकी पेटवून देण्यात आली होती. यावेळी एका आंदोलनकर्त्याचा गोळी लागून मृत्यू झाला होता. कोट्यवधींच्या संपत्तीचे दंगेखोरांनी नुकसान केले होते. या हिंसाचारात बसपाचे माजी आमदार आणि महापौर पती योगेश वर्मांसह १८३ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी शेकडो लोक तुरुंगात गेले होते. अयोध्या प्रकरणात निर्णयाच्या दिवशी या लोकांना शहराचे वातावरण प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या हिंसाचारात सामील असलेल्य़ा लोकांवर नजर ठेवली जाणार आहे. या सर्वांना एक दिवस नजरकैदेतही ठेवले जाऊ शकता.

'मावळते मुख्यमंत्री' म्हणत शिवसेनेने फडणवीसांना डिवचले

१० हजारहून अधिक व्हॉट्सअप ग्रूप्सवर पोलिसांची नजर आहे. सायबर पोलिसांचे चार पथक तैनात करण्यात आले आहेत. या प्रकरणाशी निगडीत वादग्रस्त फोटो शेअर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. जर एखाद्याने असे केल्यास त्याच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल.

वाहतूक पोलिसांकडे ८ ड्रोन कॅमेरे देण्यात आले आहेत. त्या माध्यमातून सर्व घडामोडींवर नजर ठेवण्यात येणार आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर दररोज पोलिसांच्या ४० हून अधिक बैठका होत आहेत.

शिवसेनेला आणखी एका अपक्ष आमदाराचा पाठिंबा