पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारताने पाकिस्तानला दिलेल्या प्रत्युत्तरात १८ दहशतवादी ठार

दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त

पाकिस्तानने केलेल्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत भारतीय लष्कराने पाक व्याप्त काश्मीरमधील (पीओके) तीन दहशतवादी तळ नष्ट केले होते. यामध्ये जवळपास १८ दहशतवादी ठार झाल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. नाव जाहीर न करण्याच्या अटीवर या अधिकाऱ्यांनी सांगितले की, १९ आणि २० ऑक्टोबर रोजी झालेल्या या कारवाईत पाकिस्तानचे १६ सैनिक ठार झाले आहेत. हिंदुस्थान टाइम्स या वृत्तपत्राने ही माहिती दिली आहे.

कोल्हापूरात सापडले ६९ गावठी बॉम्ब; दोघांना अटक

या अधिकाऱ्यांनी पुढे असे सांगितले की, भारतीय जवानांच्या या प्रत्युत्तर कारवाईमध्ये जैश-ए-मोहम्मद आणि इतर दहशतवादी संघटनांनाचे तळ नष्ट करण्यात आले आहेत. या कारवाईनंतर लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी सांगितले की, 'भारतीय सैनिकांच्या कारवाईत आणखी एक दहशतवादी संघटनेच्या तळाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच, नियंत्रण रेषेच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधांनाचे देखील नुकसान झाले आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना या कारवाईबाबत माहिती दिली असल्याचे रावत यांनी सांगितले. 

राज्यातील या प्रतिष्ठित लढतीकडे महाराष्ट्राचं लक्ष

संरक्षण मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, पाकिस्तानी सैन्याचा दारूगोळा साठा आणि रेशन डेपो देखील प्रत्युत्तर हल्ल्यात नष्ट करण्यात आले आहे. नीलम घाटीमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करण्यात आला. तर जुरा, अथामुक्कम आणि कुंडलशाहीमधील दहशतवादी तळ देखील २० ऑक्टोबरच्या रात्री नष्ट करण्यात आले होते. 

आरेतील वृक्षतोडीनंतर शिळफाटा येथे ५१ हजार वृक्षांची लागवड