पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तुर्कस्तान भूकंपाच्या धक्क्याने हादरले; १८ जणांचा मृत्यू

तुर्कस्तान भूकंप

तुर्कस्तान भूकंपाच्या धक्क्याने हादरले आहे. तुर्कस्तानच्या पूर्वेकडील भागामध्ये ६.८ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूंकपाचे धक्के बसले. शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास एकापाठोपाठ एक भूकंपचे धक्के बसले. यामध्ये १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. 

कोणाला तरी वाचविण्यासाठी भीमा-कोरेगावचा तपास NIA कडे - अनिल देशमुख

आपत्ती व आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू पूर्व एलाजिग प्रांतातील सिवरिस येथे आहे. स्थानिक वेळेनुसार रात्री ८ वाजून ५५ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. एकापाठोपाठ एक भूकंपाचे धक्के जाणवायला लागल्यानंतर घाबरलेल्या नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. 

निर्भया प्रकरणातील चारही दोषींवर सतत लक्ष ठेवलं जातंय, का

भूकंपाच्या धक्कामुळे तुर्कस्तानच्या पूर्व प्रातांतील ४ ते ५ इमारती कोसळल्या. तर १० पेक्षा जास्त इमारतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक जण बेघर झाले आहेत. काही जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. बचावकार्य युध्दपातळीवर सुरु आहे.

... हे गोंधळलेल्या मनःस्थितीचे लक्षण, शिवसेनेची राज ठाकरेंवर 

तुर्कस्तानमधील अनेक मानवतावादी संघटनांनी बचाव दल पाठविले आहेत. भूकंपग्रस्त नागरिकांना अन्न, पाणी, ब्लँकेट आणि इतर गरजू वस्तूंचा पुरवठा करत आहेत.  भूकंपाचा धक्का ऐवढा मोठा होता की तुर्कस्तानच्या शेजारील इराण, सिरिया आणि लेबनॉनमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.

मोबाईल चोरट्याला मिळाली मोठी शिक्षा, बोटाचे करावे लागले