पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लोकसभेचा चेहरा बदलणार, अडवाणी-जोशींच्या जागेवर नवे दिग्गज

मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी

१७ व्या लोकसभेत अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश झाला आहे. तर दुसरीकडे राजकारणातील अनेक दिग्गज यंदा लोकसभेत नसतील. याचा परिणाम लोकसभेच्या ज्येष्ठ नेत्यांच्या पहिल्या रांगेवरही पडेल. 

यामध्ये माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा, लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी, सुषमा स्वराज आणि मल्लिकार्जून खरगे आदी प्रमुख चेहऱ्यांचा समावेश आहे. ज्या नव्या नेत्यांना स्थान मिळेल त्यामध्ये गृहमंत्री अमित शहा, कायदा मंत्री रविशंकर प्रसाद आणि अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत. 

RSS ची विचारधारा देशासाठी घातकः शरद पवार

अडवाणी, जोशी आणि सुषमा स्वराज यांनी निवडणूक न लढवल्यामुळे त्यांची पहिली रांग रिकामी होणार आहे. पंतप्रधानांच्या जागेशेजारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह बसणार की गृहमंत्री अमित शहा हे अजून स्पष्ट झालेले नाही. इतरमध्ये नितीन गडकरी आणि सदानंद गौडा पहिल्या पंक्तीत बसतील. रविशंकर प्रसाद आणि नरेंद्रसिंह तोमर यांना पहिल्या पंक्तीत जागा मिळू शकते. 

लोकसभेचा चेहरा बदलणार

१७ व्या लोकसभेचे सत्र १७ जूनपासून सुरु होत आहे. त्यावेळी सभागृहाचा चेहरा मोठ्याप्रमाणात बदलल्याचे दिसेल. संख्याबळाच्या हिशेबाने पहिल्या २० रांगेतील २० पैकी १३ रांगा या एनडीएच्या हिश्श्याला येतील. एक जागा लोकसभा उपाध्यक्षांसाठी असेल. उर्वरित सहा रागांपैकी २ काँगेस आणि एक-एक द्रमुक, वायएसआर काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या हिश्श्याला येईल.

'उद्धव ठाकरे १० वेळा अयोध्येत गेले तरी उपयोग नाही'

अनेक मोठे नेते दिसणार नाहीत

सभागृहात अनेक मोठे नेते दिसणार नाहीत. भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी आणि सुषमा स्वराज यांनी निवडणूक लढवलेली नाही. दर एच डी देवेगौडा, अण्णा द्रमुकचे नेते वेणुगोपाल, काँग्रेसचे मल्लिकार्जून खरगे हे पराभूत झाले आहेत. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनीही लोकसभा निवडणूक लढवली नव्हती.