पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पंजाबः गुरदासपूरमध्ये फटाक्याच्या कारखान्यात स्फोट, २३ ठार

पंजाबः गुरदासपूरमध्ये फटाक्याच्या कारखान्यात स्फोट, १७ ठार (ANI photo)

पंजाबमधील गुरदासपूर येथील बटाला येथे बुधवारी एका फटाक्याच्या कारखान्यात आग लागून स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत २३ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाले आहेत. स्फोटामुळे कारखान्याच्या इमारतीचा काही भाग कोसळला असून त्याखाली आणखी काही जण अडकले असण्याची शक्यता आहे. स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर एकच हलकल्लोळ माजला होता.

आग लागल्यानंतर लोकांनी अग्निशामक दलाला याची माहिती दिली. त्यानंतर अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी त्वरीत रवाना झाले. आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. स्थानिकांच्या मते, परिसरात धुराचे लोट पसरल्यामुळे बचाव कार्याला अडचणीचा सामना करावा लागत आहे. 

काश्मिरात दोन जिवंत दहशतवाद्यांना लष्कराने पकडले

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ५ सप्टेंबरला एका लग्नाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी कारखान्यात फटाके तयार केले जात होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली. स्फोटानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी रवाना झाले. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. 

तरुणाची स्कूटी १५ हजारांची अन् चलान फाडले २३ हजार

दरम्यान, गुरदासपूरचे भाजपचे खासदार सनी देओल यांनीही या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे की, बटाला कारखान्यात झालेल्या स्फोटाची माहिती ऐकून दुःख झाले आहे. बचाव कार्यासाठी एनडीआरएफची पथके आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे.