पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... आणि कोरोना प्रतिबंधक प्रोटेक्टिव्ह सूट्सचे उत्पादन देशात झाले सुरू!

सरकारने नक्की किती प्रोटेक्टिव्ह सूट्सची ऑर्डर दिली आहे, याबद्दल तन्मय सिंघल किंवा इतर कोणत्याही उत्

कोरोना विषाणूविरोधातील लढाईत डॉक्टर, नर्स आणि इतर आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले प्रोटेक्शन सूट्स (पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट्स) यांच्या निर्मितीसाठी देशातील १७ कंपन्यांना सरकारकडून विचारण्यात आले होते. त्यापैकी काहींनी लगेचच यावर काम सुरू करून प्रोटेक्टिव्ह सूट्सच्या उत्पादनाला सुरुवात केली आहे. देशात सध्या काही प्रमाणात प्रोटेक्टिव्ह सूट्सचा तुटवडा आहे. त्यामुळे त्याच्या निर्मितीला सरकारकडून प्राधान्य दिले जात आहे.

देशातील १५६ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे

आतापर्यंत हे प्रोटेक्टिव्ह सूट्स भारत परदेशातून आयात करीत होता. पण कोरोना विषाणूचे संक्रमण संपूर्ण जगभरात असल्यामुळे सध्या हे सूट्स निर्यात करण्यास कोणताच देश तयार नाही. त्यामुळेच सरकारने भारतातील उत्पादकांकडे यासाठी विचारणा केली. २७ फेब्रुवारीपासून यासाठी प्रयत्नांना खरी सुरुवात झाली.

हरियाणातील साई सिनर्जी कंपनीचे तन्मय सिंघल म्हणाले, केंद्र सरकारच्या वस्रोद्योग आणि आरोग्य मंत्रालयाकडून आम्हाला फेब्रुवारी अखेरिस एका बैठकीला बोलावण्यात आले. वस्त्रोद्योग मंत्रालयात संशोधन विभागात संचालक असलेले बलराम कुमार यांनी ही बैठक घेतली. प्रोटेक्टिव्ह कपडे तयार करणाऱ्या निवडक कंपन्यांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. त्यावेळीच प्रोटेक्टिव्ह सूट्सच्या उत्पादनाबद्दल आम्हाला विचारण्यात आले. या बैठकीनंतर आम्ही लगेचच त्याचे डिझाईन्स निश्चित केले आणि दोन आठवड्यांपूर्वी उत्पादनाला सुरुवातही केली. आम्ही दिवसाला १२ ते १५ हजार प्रोटेक्टिव्ह सूट्स उत्पादित केले आहेत. अर्थात सध्या लॉकडाऊन असल्यामुळे कच्चा माल आणि कामगार उपलब्ध होण्यात अनेक अडचणी आहेत, असे तन्मय सिंघल यांनी सांगितले.

रविवारी रात्री ९ वाजता प्रत्येकांनी ९ मिनिटांचा वेळ द्या- पंतप्रधान

प्रोटेक्टिव्ह सूट्सच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल बंगळुरूमधून येतो. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे कच्चा माल आणणारे ट्रक काही वेळा अडकून पडतात. जर हा कच्चा माल आम्हाला वेळेत मिळाला तर आम्ही सरकारला सांगितल्याप्रमाणे या सूट्सचे उत्पादन निश्चितपणे करू शकू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारने नक्की किती प्रोटेक्टिव्ह सूट्सची ऑर्डर दिली आहे, याबद्दल तन्मय सिंघल किंवा इतर कोणत्याही उत्पादकाने माहिती देण्यास नकार दिला. फक्त कच्चा माल मिळणे हेच आमच्यापुढील सर्वात मोठे आव्हान असल्याचे सगळ्यांचे म्हणणे आहे.