पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उत्तराखंडमध्ये दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये 16 जणांचा मृत्यू

उत्तराखंड स्कूलबस अपघात

उत्तराखंडमध्ये आज सकाळी दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातामध्ये 16 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. टिहरी गढवाल येथे स्कूलबस दरीत कोसळून अपघात झाला. यामध्ये 9 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर दुसरा अपघात बद्रीनाथ महामार्गावर झाला. प्रवासी बसवर दरड कोसळली. यामध्ये 7 प्रवाशांचा मृत्यू झाला. दरम्यान, या दोन्ही अपघाताचा तसाप पोलिसांकडून सुरु आहे. 

अखंड हिंदुस्थानचे निम्मे स्वप्न पूर्ण झाले, शिवसेनेकडून सरकारचे कौतुक

टिहरी गढवालच्या कांगसालीमध्ये स्कूलबस दरीमध्ये कोसळली. ही बस 18 विद्यार्थ्यांना शाळेमध्ये घेऊन जात होती. या अपघातामध्ये 9 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर 8 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य सुरु आहे. जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस दरीमध्ये कोसळली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या अपघातामध्ये काही विद्यार्थ्यांचे हात, पाय आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या मुलांवर उपचार सुरु आहेत.

कसारा घाटातल्या नव्या रस्त्याला तडे; मोठी वाहतूक कोंडी

तर, दुसरी घटना बद्रीनाथ महामार्गावर घडली आहे. लामबगढ येथे प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसवर दरड कोसळली. या अपघातामध्ये 7 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. सध्या बचावकार्य युध्दपातळीवर सुरु आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरु केला आहे. 

कलम ३७० : अमित शहा यांना कोणाची मदत होती माहितीये?