पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उत्तर प्रदेशमध्ये तिहेरी अपघातात १६ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश अपघात

उत्तर प्रदेशमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. राष्ट्रीय महामार्ग - २४ वर तिहेरी अपघात होऊन १६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात ऐवढा भीषण होता की अपघातात तिन्ही गाड्यांचा चुराडा झाला आहे. दरम्यान, पोलिसांकडून या अपघाताचा तपास सुरु असून ट्रक चालकाचा शोध सुरु आहे. 

परदेश दौऱ्यावरुन परतताच मोदी जेटलींच्या घरी, वाहिली श्रद्धांजली

उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूर जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे. लखनऊ -दिल्ली महामार्गावर मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास हा अपघात झाला. सीतापूरवरुन येणाऱ्या भरधाव ट्रकने आधी पुढे चालणाऱ्या टेम्पोला धडक दिली. या टेम्पोमध्ये १० प्रवासी होते. धडक दिल्यानंतर टेम्पो पलटी होऊन रस्त्याच्या कडेला पलटी झाला. त्यानंतर या भरधाव ट्रकने समोरुन येणाऱ्या छोट्या टेम्पाला धडक दिली त्यानंतर ट्रक टेम्पोवरच पलटी झाला. 

सोलापूरातील भाविकांच्या गाडीला अपघात; ५ जणांचा मृत्यू

या अपघातामध्ये १६ जणांचा मृत्यू झाला आहे तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामधील अनेक जणांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहे. या अपघातानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संपूर्ण अपघाताची माहिती घेतली. जखमींवर उपचार करत मृतांना मदत जाहीर करण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

गणेशोत्सवानिमित्त कोकण मार्गावर टोलमाफी