पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बांगलादेशमध्ये दोन रेल्वेची समोरासमोर धडक; १६ प्रवाशांचा मृत्यू

बांगलादेश रेल्वे अपघात

बांगलादेशमध्ये मंगळवारी दोन रेल्वेची समोरा-समोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. बांग्लादेशच्या ब्रह्मनबरिया जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या अपघातामध्ये १६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर ६० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा अपघात ऐवढा भीषण होता की दोन्ही रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस 

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मन्दोबाग स्टेशनजवळ चटगावला जाणाऱ्या उद्यान एक्स्प्रेसने ढाक्याला जाणाऱ्या तुर्ना निशिता एक्स्प्रेसला धडक दिली. या अपघातामध्ये १२ प्रवशांचा जागीच मृत्यू झाला तर इतर ४ प्रवाशांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर ताबडतोब बचावकार्य युध्दपातळीवर करण्यात आले. जखमी झालेल्या ६० प्रवाशांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. आणखी काही प्रवासी अपघातग्रस्त रेल्वेमध्ये अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. जखमी प्रवाशांवर नजीकच्या रुग्णालत उपचार सुरु आहेत. 

शिवसेनेची सुप्रीम कोर्टात धाव, कपिल सिब्बल मांडणार बाजू

दरम्यान, या अपघातानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी  तुर्ना निशिता एक्स्प्रेसच्या चालकाला निलंबित केले आहे. या अपघाताच्या तपासासाठी चार वेगवेगळ्या समितीची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने देखील अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तपासासाठी आणखी एक समिती नेमली आहे. या अपघातामुळे रेल्वे रुळाचे मोठे नुकसान झाले आहे. बांगलादेशच्या रेल्वेमंत्र्यांनी अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना १ लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जिल्हा प्रशासनाने देखील मृतांच्या कुटुंबियांना २५ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. 

ये सब खेल हो रहा है, ओवेसींचा आघाडी-शिवसेनेला टोला